नागपूर - सर्व देशवासियांनी संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे, असे वक्तव्य आरएसएसचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. तसेच सरकारने आणलेल्या सीएएला विरोध न करता हा कायदा का आणला? हे समजून घेतलं पाहिजे असेही जोशी म्हणाले. मात्र, देशातील वातावरण का खराब केले जाते ते कळत नसल्याचे जोशी म्हणाले.
भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संघ कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएए ला विरोध करणाऱ्यांनी हा कायदा समजून घेण्याचे आवाहन केले. या कायद्यात सर्व धर्मातील लोकांना सामावून घेतले असल्याचे ते म्हणाले. या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव केला नसल्याचे जोशी म्हणाले.