ठाणे- नाशिक निवडणुकीत अपक्ष म्हणून सत्यजित तांबे निवडून आल्यानंतर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यात गटबाजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच बाळासाहेब थोरात यांनी राजीना दिल्याची चर्चा आहे. त्याव नाना पटोले म्हणाले, की बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. कसबामध्ये भाजपची काय अवस्था आहे त्याची चर्चा होत नाही. पण आमचे दोन नेते काही वैयक्तिक कारणाने आले नाही. तर त्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते. बाळासाहेबांची तब्येत चांगली नाही. जर तुमच्याकडे राजीनाम्याचे पत्र असतील तर तुम्ही दाखवा. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. पक्षामधून मला जी काही जबाबदारी दिलेली आहे ती मी निभावत आहे. याबाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेतील. बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य लाभो.
१५ फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक कार्यकारणीची बैठक तीन महिन्यात घ्यायची असते. मागच्या महिन्यात नागपूरमध्ये प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. आमच्या समोर पोटनिवडणूक आहेत. पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश आले. त्या आमदारांचा सत्कार होणार आहे. राहुल गांधी यांच्याबरोबर कन्याकुमारी ते काश्मीर जे भारतीय चालले त्यांचा सत्कार व पुढच्या रणनीती बद्दल कार्यकारिणीची बैठक १५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामध्ये पक्षाच्या पातळीवर या सर्व गोष्टींची चर्चा केली जाईल. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास बसत आहे. राहुल गांधी यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्ष पातळीवर चालू आहे.
मूळ मुद्द्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपने जनतेचा मोठा विश्वासघात केला. एलआयसी व बँकांमध्ये लोकांनी ठेवलेला आपल्या कामाचा पैसा होता. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. त्यामागे तोच हेतू होता की जनतेचा पैसा त्यांना भेटावा. तेच लोकांचे पैसे अदानी कंपनीने खोटे कागद दाखवून लोकांचे बँकांचे पैसे लुटले. ही लढाई आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये लढत आहोत. ही जनतेच्या हक्काची लढाई आम्ही राज्यात नाहीतर देशात एकत्र लढलो. जे मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढण्याच्या भूमिकेत आहे. ही प्रेरणा आम्हाला राहुल गांधी यांनी दिलेली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील कलह टोकाला गेल्याचं सर्वांसमोर आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती. अशातच आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्तानंतर ही नाराजी अगदी टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तांबे-थोरात विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत काम करणे शक्य नाही अशा आशयाचे पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना पाठवल्याचे चर्चा सुद्धा सध्या रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांनी आता काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
थोरातांचे मन वळवणार की, नवा बदल घडवणार? दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचे मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांच्या निकटवर्तीयांनी नाव न सांगण्याच्या या बातमीला दुजोरा दिला आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही.