ETV Bharat / state

रिक्षात प्राणवायूचे सिलिंडर बसवित तो बनला 'ऑक्सिजन-दूत'

एकीकडे नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना या विपरीत परिस्थितीतही रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एका ऑटो चालकाने चक्क ऑटोरिक्षात ऑक्सिजन सिलिंडर बसवून घेतले आहे. कोरोनामुळे रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून हा ऑटो चालक ही सेवा अगदी निशुल्क देतो आहे. आनंद वर्धेवार असं या समाजसेवी ऑटोचालकचे नाव आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्याने रुग्णांसाठी ही सेवा सुरू केली आहे.

nagpur auto news
रिक्षाच बनवली 'रुग्णवाहिका'
author img

By

Published : May 12, 2021, 9:07 AM IST

Updated : May 12, 2021, 9:15 AM IST

नागपूर - कोरोना संकटाच्या काळात नागपूर शहरामध्ये समाजसेवेचे व्रत घेतलेली अशी अनेक माणसं पुढे येत आहेत, ज्यामुळे अजूनही माणुसकी शिल्लक आहे यावर विश्वास कायम ठेवण्याचं धाडस नागपूरकर करत आहेत. अन्यथा या कठीण काळात सुरू असलेली लूट माणुसकीला मान शरमेने खाली घालायला लावत आहे. एकीकडे नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना या विपरीत परिस्थितीत रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एका ऑटो चालकाने चक्क ऑटोरिक्षात ऑक्सीजन सिलिंडर बसवून घेतले आहे. कोरोनामुळे रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून हा ऑटो चालक ही सेवा अगदी निशुल्क देतो आहे. आनंद वर्धेवार असं या समाजसेवी ऑटोचालकचे नाव आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्याने रुग्णासाठी ही सेवा सुरू केली आहे.

रिक्षाच बनवली 'रुग्णवाहिका'

ऑटोरिक्षातच बसवले प्राणवायू सिलेंडर -

एकीकडे प्राणवायूसाठी धावाधाव होत असताना आनंद वर्धेवार कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू-दूत ठरले आहेत. ऑटोचालक आनंद वर्धेवार यांचं पूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झालं होतं. त्या वेळेस त्यांना प्राणवायू मिळविण्याकरिता जो त्रास त्यांना झाला तो त्रास इतर रुग्णांना होऊ नये म्हणून त्यांनी ऑटोरिक्षातच प्राणवायू (ऑक्सिजन) सिलिंडर बसवून घेतलं आहे.

nagpur auto news
रिक्षाच बनवली 'रुग्णवाहिका'

कोरोना रुग्णांची निःशुल्क सेवा -

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णाला प्राणवायू उपलब्ध व्हावा या करीता नातेवाईकांची होणारी धावाधाव ऑटोचालक आनंद वर्धेवार यांनी अगदी जवळून अनुभवली आहे. जेव्हा पैसे मोजून सुद्धा प्राणवायू मिळत नाही. त्यावेळी रुग्णाची आणि कुटुंबियांची काय अवस्था याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच सर्वत्र रुग्णांची लूट सुरू असताना आनंद वर्धेवार विपरीत परिस्थितीत कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. गरीब रुग्णांना ते ऑटोरिक्षातून रूग्णालय निःशुल्क घेऊन जातो. गरज असेल तर प्राणवायू लावतात.

nagpur auto news
रिक्षाच बनवली 'रुग्णवाहिका'

५० पेक्षा जास्त रुग्णांना पोहचवले रुग्णालयात -

ऑटो चालक आनंद हा गेल्या २० वर्षांपासून ऑटो चालवतो,मात्र सध्याच्या या कठीण काळात रुग्ण वाहिका चालकांनी सुरू केलेली लूट बघून आनंद यांनी आपल्या ऑटोलाच रुग्ण वाहिकेत रूपांतरित करून रुग्णांची सेवा सुरू केली आहे. आनंद यांनी ५० पेक्षा जास्त गरजू रुग्णांना दवाखान्यात पोहचवण्याचे काम केले आहे.

nagpur auto news
स्वतःची पूर्णपणे काळजी

स्वतःची सुरक्षेची काळजी घेत रुग्ण सेवा -

आनंद वर्धेवार रुग्ण सेवा करताना स्वतःची पूर्णपणे काळजी घेतात. त्यांची सेवाभावी वृत्ती बघून एका खासगी रुग्णालयाने त्यांना पीपीई कीट, हॅण्ड ग्लोब्ज, ऑक्सिमिटर, तापमापिका आणि निजंर्तुकीकरण साहित्य दिले आहे.

रुग्ण वाहिकांचे दर बघून गडकरी सुद्धा आवक -

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी अनेक मुद्यांवर अतिशय सुस्पष्ट मत व्यक्त केलं. राजकारण बाजूला सारून समाजसेवा करण्यावर भर द्यावा असे ते म्हणाले. त्याच वेळी त्यांनी रुग्ण वाहिकांकडून कोरोना रुग्णांची सुरू असलेली लूट याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष वेधले. नितीन गडकरी यांचे परिचित अविनाश घुसे यांच्या आईला धंतोली येथून अजनी पर्यंत नेण्यासाठी १७ हजार रुपये घेतले असल्याचं त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे धंतोली ते अजनी हे अंतर दोन ते तीन किलोमीटर इतकेच आहे. या लुटीवर आळा बसाचा या करीता रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत.
हेही वाचा - गोव्यात रेल्वेने जाणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य

Last Updated : May 12, 2021, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.