नागपूर Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूर पोलिसांनी सुरक्षा आणि बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे. बारकाईनं सर्व गोष्टीचा विचार करुन बंदोबस्ताची आखणी करण्यात आल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यामध्ये व्हीआयपी सुरक्षा, व्हीआयपी मुव्हमेंट, नेत्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे.
शहरात तगडा बंदोबस्त तैनात : विधिमंडळ, राजभवन, नाग भवन, रवी भवन अशा ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मोर्चे निघणार आहेत. त्या निमित्तानं मोर्चाचे स्टॉपिंग पॉईंट किंवा मोर्चा स्टार्टिंग पॉईंट इथं देखील सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या सर्व नियोजनात वाहतुकीचा एक विषय नागपूर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
11 हजार कर्मचारी, अधिकारी तैनात : "विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन निर्विघ्नपणानं पार पाडण्यासाठी एकूण 11 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नागपूर पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह होमगार्ड, एसआरपीच्या आठ कंपनी अशा प्रकारचं मनुष्यबळ आम्हाला बाहेरुन मिळालं आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
हिवाळी अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगानंदेखील सर्व प्रकारच्या बंदोबस्तची आखणी करुन योग्य सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे-पोलीस आयुक्त अमितेश कुमार
मोर्चासाठी विशेष नियोजन : यशवंत स्टेडियमवर मुख्य मोर्चा स्टार्टिंग पॉईंट आहे. दोन ठिकाणी मोर्चा स्टॉपिंगचे रूट देण्यात आलेले आहेत. एक मॉरिस कॉलेज टी पॉइंट आणि दुसरा टेकडी रोड ठिकाणी मोर्चे सुरू होतील. या व्यतिरिक्त एलआयसी चौक, मोहिनी कॉम्प्लेक्स, लिबर्टी टॉकीज चौक ज्या ठिकाणी प्रत्येक वर्षी स्टॉपिंग पॉईंटचे नियोजन करण्यात आलं आहे" असंही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी म्हणाले. आतापर्यंत एकूण 48 मोर्चा अर्ज प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त अंदाजे 70 ते 75 आणखी मोर्चाचे अर्ज येण्याची शक्यता आहे. फक्त स्टार्टिंग पॉईंट कुठं राहील, स्टॉपिंग पॉईंट काय राहील, रूट काय राहील आणि कंडिशन्स आणखी काय राहील, याबद्दल आयोजकांशी चर्चा करून योग्य नियमाप्रमाणं परवानगी देऊ, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस; विरोधक आणि सत्ताधारी पक्ष आमनेसामने
- Maharashtra Monsoon Assembly session 2023 : मुख्यमंत्री आणि एकही उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विरोधक आक्रमक
- Monsoon session 2023 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजले, हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून