नागपूर - आतंकवाद्यांचा खात्मा केले, असे मोदी सांगतात. तर मग गांधीजींची हत्या ज्या गोडसेंनी केली तो कोण होता? आणि त्यात सहभागी असलेले सावरकर कोण होते? हे मोदींनी सांगावे, असे आव्हान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात केले. वंचित बहूजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्वतःला चौकीदार म्हणणारे चौकीदाराची नोकरी वाचविण्यासाठी दलित मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांच्याकडे बघून आजसुद्धा गुजरातचा मुख्यमंत्री आठवतो ज्याच्या राज्यात निरपराध मुस्लिमांचा बळी गेला. तसेच नागपूर ही ती जागा आहे, की जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला सांगितले की कुठलीही जात नसते.
विदर्भात शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र, त्याला आळा न बसता त्यात आणखी वाढ झाली. मोदींनी किती रोजगार उपलब्ध केलेत याबद्दलची माहिती त्यांनी द्यावी, असेदेखील ओवेसी यावेळी म्हणाले.