ETV Bharat / state

अल्पवयीन दिव्यांग मुलीवर आधी अत्याचार, नंतर गर्भपात; आईसह नराधम अन् परिचरिका गजाआड

काटोल (जि.नागपूर) येथील वसतीगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर वसतीगृह अधीक्षकाने वारंवार बलात्कार केला. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र, पीडितेच्या आईवर दवाब टाकत नराधमाने एका परिचारिकेच्या मदतीने त्या मुलीचा गर्भपात केला. याप्रकरणी पीडितेची आई व अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

hostel
वसतीगृह
author img

By

Published : Jun 6, 2020, 12:12 PM IST

नागपूर - वडिलांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार करणारा नराधम तसेच तिचा गर्भपात करणाऱ्या आईसह परिचरिकेला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात ही घटना घडली.

काटोल येथील दिव्यांग मुलींच्या वसतीगृहाच्या अधीक्षकाने एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. पीडित मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा गर्भपात करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या नराधमाने केला. याप्रकरणी वसतीगृह अधीक्षक राजेंद्र काळबांडेसह परिचारिका सिंधू देहनकार आणि पीडित मुलीची आई अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. महत्वाचे म्हणजे पीडितेच्या घरातच गर्भपात करण्याचा प्रकार सुरू होता. यासंदर्भात पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

वसतीगृह अधीक्षक राजेंद्र कलबांडे या नराधमाने पीडित मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन वारंवार अत्याचार केला. यातून तिला गर्भधारणा झाली. लॉकडाऊनच्या काळात ही मुलगी घरी परतली तेव्हा हा गंभीर प्रकार समोर आला. त्यांनतर आईने पीडित मुलीकडे विचारपूस केली असता तिने घडला प्रकार आईला सांगितले. पीडित मुलीच्या आईने यासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने तिला देखील धमकावून पीडितेचा गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. नंतर नराधामने परिचारिका सिंधू देहनकर हिच्या मदतीने पीडित मुलीचा गर्भपात करून गर्भ जमिनीत पुरला. या सर्व घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपी राजेंद्र काळबंडे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव अचरेकर यांनी दिली.

हेही वाचा - कन्हान नदीच्या हरदास स्मशान घाटात दगडाने ठेचून अनोळखी व्यक्तीचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.