ETV Bharat / state

सुपारी तस्करी प्रकरण: 19 ठिकाणी सीबीआयची छापेमारी, हजारो कोटींचा कर चुकवल्याची चौकशी सुरू

author img

By

Published : Jul 1, 2021, 2:11 PM IST

इंडोनेशियामधून सडकी आणि आरोग्यास धोकादायक सुपारी भारतात तस्करी केली जात होती. या सुपारीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद मधील 19 ठिकाणी छापेमारी केली आहे. सार्क देशाच्या नावाखाली चोरट्या व्यापारासंदर्भात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली होती. तेव्हा न्यायालयाने या प्रकरणात सीबीआयला तपास करण्याचे निर्देश दिले होते.

Arecanut smuggling case: CBI raids 19 places
सुपारी तस्करी प्रकरण: 19 ठिकाणी सीबीआयची छापेमारी, हजारो कोटींचा कर चुकवल्याची चौकशी सुरू

नागपूर - सार्क देशांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे इंडोनेशियामधून सडकी आणि आरोग्यास धोकादायक सुपारी भारतात तस्करी केली जाते. या सुपारीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद मधील 19 ठिकाणी छापेमारी केली आहे. या संदर्भात नागपूर खंडपीठात एका याचिकेच्या सुनावनी दरम्यान यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

सुपारी उद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांची चौकशी सुरू -

सार्क देशाच्या नावाखाली चोरट्या व्यापारासंदर्भात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली होती. तेव्हा न्यायालयाने या प्रकरणात सीबीआयला तपास करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजचे अज्ञात अधिकाऱ्यांचे नाव होते. यावेळी ते अधिकाऱ्याचे काय नाव आहे अशी विचारणा करण्यात आली होती. याच प्रकरणात विविध ठिकाणी या सुपारी उद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

नागपूरसह अन्य शहरात झाली कारवाई -

या प्रकरणात सीबीआयच्या नागपूर युनिटच्या अधीक्षक निर्मला देवी यांच्या नेतृत्वात पथकांनी नागपुरात शांती नगर, चिखली लेआऊट, भावसार चौक आणि वर्धमान नगरात चार ठिकाणी व्यापाऱ्यांची चौकशी केली आहे. यासोबतच मुंबईत सात ठिकाणी, नवी मुंबईत तीन ठिकाणी तर अहमदाबादेत दोन ठिकाणी तपास मोहीम राबवून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी इंडोनेशियामधून सुपारीच्या आयात प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या बनावट कंपन्या बद्दल महत्वाचे कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, यासह जप्त केले आहे.

धोकादायक ठरते आहे सुपारी, तस्करीत अधिकाऱ्यांचीही साथ -

दरम्यान, या घोटाळ्यात कस्टम ड्युटी चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांना कस्टम आणि सेंट्रल एक्साईजचे कोणते अधिकारी मदत करत होते हे अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, हे प्रकरण फक्त कस्टम ड्यूटीची चुकवेगिरी एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर इंडोनेशियामधून आयात केली जाणारी सडकी सुपारी आरोग्यासाठी घातक, कर्करोगाला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. यात गुटखा आणि खर्रा खाणाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. असे या याचिकेत म्हटले आहे.

सार्क देशासोबत कराराचे काय आहेत फायदे -

सार्क संघटनेतील देशांसोबत आपसात झालेल्या व्यापारी करारानुसार 13 टक्के कस्टम ड्युटी द्यावी लागते. यामुळे भारतात बहुतांश ठिकाणी भारतीय व्यापाऱ्यांनी सार्क देशातुन सुपारीची आयात करतात. पण जर सार्क देशांच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून सुपारी आयात केली तर त्यावर तब्बल 113 टक्के कस्टम ड्युटी नियमानुसार लागते. म्हणजे 100 टक्के अधिक कस्टम ड्युटी हीच चुकवण्यासाठी भारतातील काही व्यापारी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या काही अधिकाऱ्यांसोबत चोरटा व्यवहार करत असल्याचे याचिकेतून मांडण्यात आले होते.

सुपारीवरची कस्टम ड्युटी चुकून केली जाते तस्करी -

पण हे करताना इंडोनेशियाची सुपारी सार्क देशातून आयात केल्याचे दर्शवत जात होते. पण प्रत्यक्षात त्यासाठी काही बनावट कागदोपत्री बिलाचा आधार घेऊन हा व्यवहार होत असल्याचे बोलले जाते. भारतात ही सुपारी नेपालमधून आयात केल्याचे दाखवले जाते. पण ही इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ येथून भारतात येते. या व्यवहाराच्या माध्यमातून भारतीय व्यापाऱ्यांना इंडोनेशियामधील सडकी आणि आरोग्यासाठी धोकादायक सुपारीच्या आयातीवर तब्बल १०० टक्के कस्टम ड्युटी चुकवता येत होती. केंद्र सरकारचा कर चुकवत कोट्यवधी रुपयांना चुना दरवर्षी लावला जात आहे. असे याचिकेत म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.