ETV Bharat / state

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण: मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर - विधेयक

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण: मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर
author img

By

Published : Jun 20, 2019, 8:23 PM IST

मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

राज्यमंत्री मदन येरावार यांनी हे विधेयक मांडले होते. चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने मराठा समाजाला (एसईबीसी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

राज्य सरकारने पीजी मेडिकल मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते सभागृहात मांडले. त्यानंतर विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यात मराठा समजाला आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने लागू केला होता. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2 नोव्हेंबर रोजी हे आरक्षण लागू केल्याचा दावा करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, तिथेही न्यायलयाने विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश काढला होता.

Intro:Body:
MH_MUM_Medical,_Reservation_Vidhansabha_7204684

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर
मुंबई:
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
राज्यमंत्री मदन येरावार यांनी हे विधेयक मांडले होते. चर्चेविना हे विधेयक मंजूर झालं.
राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने मराठा समाजाला (एसईबीसी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
वैद्यकीय व दंत वैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने यंदापासूनच मराठा आरक्षण लागू केले. त्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा आदेश देऊन प्रवेश प्रक्रिया रद्द ठरवली. तो आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी नाराज होऊन सरकारविरुद्ध आंदोलनाला सुरुवात झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यंदापासूनच आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने कॅबिनेटची विशेष बैठक बोलवून अध्यादेश पारित केला. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता एसईबीसी आरक्षण पूर्वलक्ष्यीप्रभावाने लागू झाला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.