नागपूर - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर सीबीसीय आणि ईडीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर कुणी चुकीचे केले असेल, तर ते पुढे येईलच. मात्र, याचा दुसरा अर्थ काढणे चुकीचे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
हल्लीच्या ईडीच्या नोटीस मिळणे सामान्य -
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी (29) रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्यात ५० लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्यावरून ईडी या आर्थिक व्यवहाराची पार्श्वभूमी तपासणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे. यावर बोलताना, हल्लीच्या नेत्यांना ईडीच्या नोटीस मिळणे सामान्य झाले असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
सूडच्या भावनेतून राजकारण सुरू आहे -
गेल्या काही काळात ईडीकडून सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना नोटीस देण्यात आली आहे. अशा नोटीसीला कायद्याने उत्तर देणे आमचे काम आहे. बदलाच्या भावनेतून ईडीकडून नोटीस येत आहेत. भाजपकडून सूड भावनेतून राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - 'संजय राऊतांचा एवढा गोंधळ कशाला? पैसे चोरीचे आहेत, हिशोब द्यावाच लागेल'