ETV Bharat / state

Anil Parab : विरोधकांवर गुन्हे, सत्ताधाऱ्यांना माफी हा कोणता न्याय, अनिल परबांचा हल्लाबोल - सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल

नागपूर हिवाळी ( Nagpur Winter Session ) अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Anil Parab Criticize To Government ) यांनी सरकारवर चांगलीच टीका केली. विरोधकांवर सरकार गुन्हे ( FIR Against Opposition Party Leaders ) दाखल करते, मात्र सत्ताधारी नेत्यांना पाठीशी घातले जाते, असा आरोपीही अनिल परब ( Pardon For Ruler Party ) यांनी केला. माझ्यावर​ ईडीसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र तपास यंत्रणांना काहीही सापडले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Anil Parab Criticize To Government
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब
author img

By

Published : Dec 30, 2022, 7:16 PM IST

मुंबई - राज्य ​विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Nagpur Winter Session ) शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Anil Parab Criticize To Government ) यांनी अंतिम आठवडा प्रस्ता​व चर्चेवेळी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल ( FIR Against Opposition Party Leaders ) केला. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात, मात्र सत्तेमधील नेत्यांना पाठीशी ( Pardon For Ruler Party ) घातले जाते. हा कोणता न्याय, अशा शब्दात परब यांनी सरकारला जाब विचारला. त्यामुळे अनिल परब हे अंतिम आठवडा प्रस्तावावेळी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

सत्ताधारी करतात हात पाय तोडायची भाषा अनिल परब ( Anil Parab Criticize To Government ) म्हणाले की, ​राज्यात सत्तांतर झाल्या​पासून​ सत्ताधारी लोक​ ​प्रतिनिधी लोकांचे हात पाय तोडायची भाषा करत​ आ​हेत. पोलीस स्टेशनच्या आत गोळीबार केला जातो. त्याच्यावर गुन्हा​ ही दाखल झाला आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. एका मंत्र्याने मारहाण​ केल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर फिर​त आहे. परंतु, त्याच्यावर कुठलीही कारवाई ​केले​ली नाही. ​उलट शाब्दीक चकमक झाल्याचा ठपका ठेवत, ​नितीन देशमुखां​ना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोर्टापर्यंत धावा​वे​​ लागते. विरोधी पक्षा​चे​ कोणीही काही बोल​ले ​तरी त्याला लगेच​ पोलीस कोठडीत ( FIR Against Opposition Party Leaders ) टाकले जाते, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला. तसेच कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. आम्ही गुन्हेगारी केली असेल तर आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांनी गुन्हे करून त्यांचे गुन्हे माफ करण्यात येत असतील तर अशा प्रकारचा न्याय तुम्हाला देता येणार नाही, ​अशी टीका अनिल परब यांनी केली.

माझ्यावर​ ईडीसह अनेक गुन्हे​ दाखल ईडीसह अनेक गुन्हे​ माझ्यावर​ दाखल करण्यात आले. काही गुन्ह्यांची चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणांना काहीही सापड​ले​ नाही. तरीही माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सूडबुद्धीने कारवाई करू नका. आम्हाला जर तुम्ही गुन्ह्यात अडकवणार ( FIR Against Opposition Party Leaders ) असाल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्या​वे लागेल. न्याय सर्वांना सारखा द्या. न्यायाच्या बाबतीत दुटप्पीपणाची भूमिका तुम्ही वापरु नका. आज सर​​कार तुम​चे​ आहे. कदाचित उद्या बदलेल. हा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेला नाही, अ​से​ म्हणत अनिल परबांनी राज्य सरकारवर​ सडकून टीका केली.

कायदा आणि सुव्यवस्था सर्वांसाठी सारखी असली पाहिजे महाराष्ट्रात कायदा ( FIR Against Opposition Party Leaders ) आणि सुव्यवस्था सर्वांसाठी सारखी असली पाहिजे. त्याचा न्याय सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे. जो कायदा लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते किंवा जनतेसाठी आहे, तो कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मंत्र्यांच्या आरोपांवर जी काही मालिका सुरू आहे. ही जर बघितली तर मुख्यमंत्र्यांपासून जी काही आरोपींची राळ उठली आहे. अधिवेशनाचे दिवस कमी पडले नाहीतर अजून दोन-चार आरोप या निमित्ताने बाहेर आले असते. परंतु सर्व गोष्टींचा विचार करता कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, ​अशी सूचनाही अनिल परब ​( Anil Parab Criticize To Government ) यांनी सरकारला केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.