नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, आता अशी माहिती आली आहे की, केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना नेत्याचेच नाही तर भाजपच्याही काही मोठ्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन सदस्य असलेली समिती चौकशी करत असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरण: दोन सदस्यीय समिती करणार चौकशी - गृहमंत्री
भाजप नेते एकनाथ खडसे यांचा फोन टॅप करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. दरम्यान, याअगोदरच राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या प्रकरणी तपास २ सदस्यीय समिती करणार आहे. तांत्रिक तज्ञांची मदत घेऊन सखोल चौकशी करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली होती.
हेही वाचा - राहुल गांधीच्या 'त्या' वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ; धक्काबुक्कीनंतर कामकाज स्थगित