नागपूर - नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील शुभम दमडु हत्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक चित्र समोर आले आहे. हत्या प्रकरणातील तीन मुख्य आरोपींनी अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, इतर 9 आरोपींनीही या मुलीवर बलात्कार केल्याची बाब तपासात आली आहे. दरम्यान, यामध्ये उमरेड पोलिसांनी या प्रकरणातील दहा आरोपींना अटक केली आहे.
आरोपी रोशन आणि त्याच्या नऊ साथीदारांवर आरोप - चार दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे शुभम भोजराज दमडू नामक युवकाची हत्या रोशन सदाशिव कारगावकर आणि बादल यांनी केली होती. या प्रकरणी दोघांना अटक झाल्यानंतर तपास पुढे जात असताना एका अकरा वर्षीय मुलीने आरोपी रोशन आणि त्याच्या नऊ साथीदारांवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.
गुन्हा दाखल करून दहा जणांना अटक - पीडित मुलगी ही आठव्या वर्गात शिकते. रोशन पीडित मुलीला घेऊन स्वत:च्या घरी गेला. तेथे रोशन आणि त्याच्या मित्राने आळीपाळीने मुलीवर अत्याचार केला. 'अत्याचाराबाबत सांगितल्यास तुला ठार मारू,' अशी धमकी देऊन तिला ३०० रुपये दिले. त्यानंतर या दोघांनी आठ मित्रांकडून सुद्धा काही दिवसांत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून दहा जणांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड करत आहेत.
बलात्कार प्रकरण सहभागी आरोपींचे नाव - शुभमच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रोशन सदाशिव कारगावकर हा या प्रकरणातसुद्धा मुख्य आरोपी आहे. याशिवाय गजानन दामोधर मुरूसकर, प्रेमदास जागोबा गाठीबांधे, राकेश शंकर महाकाळकर, मयूर भास्कर दलाल, गोविंद गुलाब नटे, निखिल विनायक नरुले, सौरभ उत्तम रिठे, नीतेश अरुण फुकट, प्रद्युम्न दिलीप करूटकर अशी दहा आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक