ETV Bharat / state

नागपूर : शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला आग - नागपूर अग्निशमन दल बातमी

जे.बी. लायटिंग या दुकानाला सकाळी सात वाजल्याच्या सुमारास ही आग लागली होती. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

an electronic goods shop caught fire due to a short circuit in nagpur
नागपूर: शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रॉनिक सामानाच्या दुकानाला लागली आग
author img

By

Published : Nov 15, 2020, 12:17 PM IST

नागपूर - नागपुरच्या सीए मार्गावरील डागा रुग्णालयाजवळील एका इलेक्ट्रॉनिक सामानाच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. जे.बी. लायटिंग असे या दुकानाचे नाव आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती समजताच तहसील पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या ४ फायर इंजिनने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉट्ससर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुकानात ठेवलेले इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळून राख झाल्या.

इलेक्ट्रॉनिक सामानाच्या दुकानाला लागलेली आग

जे. बी. लायटिंग या दुकानात घरसजावटीच्या अनेक महागड्या वस्तू आणि विविध प्रकारचे लाईट्स मिळतात. दिवाळी निमित्ताने या दुकानात मोठ्या प्रमाणात स्टॉक ठेवण्यात आला होता. आज सकाळी दुकानातून धूर येताना दिसतातच याची सूचना दुकानचालकांसह पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने जीवितहानी टळली

जे.बी. लायटिंग या दुकानाच्या शेजारी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आहेत. सुदैवाने आग लागल्याची सूचना लगेच मिळाल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. अन्यथा आगीचे लोण इतर दुकानांमध्ये देखील पसरू शकले असते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा- बलात्काऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानं मुलीला लावलं पणाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.