ETV Bharat / state

अंबाझरी तलावाची अवस्था 'क्रिटिकल'; तलावाच्या सांडव्याला तडे

author img

By

Published : Oct 9, 2020, 6:48 PM IST

Updated : Oct 10, 2020, 10:40 AM IST

नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी अंबाझरी तलाव आहे. नागपूरच्या वैभवात भर घालणाऱ्या या तलावाच्या सांडव्याची अवस्था सध्या बिकट झाली आहे. मात्र, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

Ambazari Lake
अंबाझरी तलाव

नागपूर - यंदा राज्यभर जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच धरणे व तलाव तुडूंब भरलेले आहेत. नागपुरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावही पुर्णपणे भरला आहे. मात्र, या तलावाच्या सांडव्यांना अनेक ठिकाणी तडे गेल्याने धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब नागपूरकरांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. मात्र, प्रशासनाकडून याची कोणतीच दखल घेतली गेलेली नाही.

अंबाझरी तलावाची अवस्था बिकट झाली आहे

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरीकडे पाहिले जाते. मात्र, याच अंबाझरी तलावाची सद्यस्थिती धोकादायक असल्याचे दिसते. तलावाच्या सांडव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत, शिवाय अनेक भागात पडझडही झाली आहे. अंबाझरी तलावाची पाणी पातळी ही ८ टिएमसी असून तलावाची व्याप्ती ही २८ हेक्टर क्षेत्रात आहे. त्यामुळे तलावाच्या सांडव्याची सद्यस्थिती पाहता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला व संबधित विभागाला वारंवार लक्षात आणून दिली गेली. मात्र, याची प्रशासनाकडून अद्यापही दखल न घेतल्याचे चित्र आहे.

जलसंपदा विभागाच्या करारानुसार या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे ठरले होते. तीन वर्षे उलटून गेले तरी या तलावाकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. अंबाझरीच्या खालच्या बाजूला लाखो लोकांची वस्ती आहे. अंबाझरी तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने त्याची वेळीच डागडुजी करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया पाठबंधारे तज्ञ प्रविण महाजन यांनी दिली.

अंबाझरी तलावाला दररोज अनेक नागपूरकर भेटी देतात. परंतु तलावाची दुरावस्था पाहता नागपूरकर कसे भेट देणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या तलावाच्या पडझडीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही बाब नागपूरकरांच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

Last Updated : Oct 10, 2020, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.