ETV Bharat / state

अजनीला जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन उभारणार - नितीन गडकरी - अजनी रेल्वे स्टेशन

अजनी रेल्वे स्टेशन हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन उदयास येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. यासाठी तेराशे कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे. अमेरिकन आर्किटेक्टच्या मदतीने हा प्रोजेक्ट डिजाईन करण्यात आला असून या प्रोजेक्टच्या निर्मितीनंतर दक्षिण नागपूरचे चित्र बदललेले असणार आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari
author img

By

Published : Jan 24, 2021, 1:33 AM IST

Updated : Jan 24, 2021, 2:10 AM IST

नागपूर - अजनी रेल्वे स्टेशन हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन उदयास येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. यासाठी तेराशे कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे. अमेरिकन आर्किटेक्टच्या मदतीने हा प्रोजेक्ट डिजाईन करण्यात आला असून या प्रोजेक्टच्या निर्मितीनंतर दक्षिण नागपूरचे चित्र बदललेले असणार आहे. मल्टी मॉडेल हब अंतर्गत हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले. ते नागपुरात संत भानुदास सभागृहात रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत नागपूर शहरात बांधण्यात आलेल्या वर्धा रोड ते उमरेड रस्त्याच्या जोडणाऱ्या वंजारी नगर रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंचावर मनपाचे नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, आमदार अभिजित वंजारी, आमदार मोहन मते, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यावेळी गडकरी म्हणाले की, येत्या 31 जानेवारीला या संदर्भात बैठक होणार आहे. यात सर्वांच्या सुचना मागवण्यात येईल. आमदारांनी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहून आपल्या सूचना द्या, असे आवाहनही गडकरी यांनी केले. यात रेल्वे कर्मचाऱ्याना विश्वास देऊ इच्छितो की आज आहे त्यापेक्षा चांगल्या दर्जाचे राहण्यासाठी घर, शाळा, खेळायचे मैदान असणार आहे. आजच्या पेक्षा चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या रस्त्याचे लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आनंदा आहे. अशोक वाडीभस्मे आमदार असताना सुधाकर कोहळे यांनी सर्वाने खूप प्रयत्न केले. यात राम नाईक हे रेल्वे राज्यमंत्री झाले असताना अपेक्षेने भेटलो त्यावेळी वाटले होते जागा मिळेल. पण त्यांनी 50 कोटी रुपये जागेचे म्हटले आणि प्रोजेक्ट् पुन्हा लटकला. यात पियुष गोयल हे रेल्वे मंत्री झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न केले. यात अडचण आली पण ती सोडवली. यात हे काम होत असताना आनंद आहे. कारण एखाद्या कामात किती अडचणी याव्या हे मोजून दाखवताना त्यांनी हा आनंद व्यक्त केला. नागपुरात विदर्भातील तरुणांना प्राधान्य - मेट्रो तयार झाली आहे. ही मेट्रो नागपूर ते गोंदिया, छिंदवाडा, बैतुल, अमरावती, रामटेक, वर्धा अशा पद्धतीने सेवा सुरू करणार आहे. यात 70 टक्के केंद्र सरकारचा आणि 30 टक्के हा मेट्रोचा वाटा असणार आहे. यासाठी 30 नवीन मेट्रो घेऊ. विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनला लक्ष देण्यास सांगितले आहे. यात जे उद्योजक म्हणून तयार असतील त्यांना एक मेट्रोसाठी 36 कोटी रुपये एमएसएमई मधून कर्ज देण्यासाठी तयार आहे. यासाठी उद्योजक तयार आहे, पण पाहिले प्राधान्य हे विदर्भातील व नागपुरातील उद्योजकांना राहणार आहे.

Last Updated : Jan 24, 2021, 2:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.