ETV Bharat / state

मलिकांमुळं अजित पवारांची कोंडी, नवाब मलिक कोणाच्या गटात? अजित पवार यांचे कानावर हात - नवाब मलिकांमुळं अजित पवारांची कोंडी

Ajit Pawar On Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या उपस्थितीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी झाली आहे. त्यामुळं अजित पवारांनी नवाब मलिक यांच्याबद्दल आपली भूमिका मांडताना कमालीचा सावधपणा बाळगला आहे.

Ajit Pawar On Nawab Malik
Ajit Pawar On Nawab Malik
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 5:14 PM IST

नागपूर Ajit Pawar On Nawab Malik : ''राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार नवाब मलिक महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच सभागृहात आले. मात्र, ते कोणत्या गटात आहेत, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर 'मी' या सर्वांवर प्रतिक्रिया देईन,'' असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवार यांना पत्र लिहून सत्ताधारी गटात नवाब मलिक यांचा समावेश करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळं नवाब मलिक सध्या तरी अजित पवार गटात असून नसल्यासारखे आहेत, हे अजित पवारांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येतंय.

"फडणवीस यांचं पत्र मला मिळालं आहे. नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका काय आहे, हे समजल्यानंतर मी माझे म्हणणं मांडेन, विधानसभेत कोणाला कुठं बसवायचं, हे मी ठरवत नाही, तो निर्णय विधानसभाध्यक्ष घेतात" - अजित पवार, उपमुख्यमंत्री

'तो' निर्णय अध्यक्षांचा : पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "नवाब मलिक यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं. ते मी वाचलं आहे. नवाब मलिक काल पहिल्यांदाच सभागृहात आले. ते सभागृहात कुठे बसले, याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. त्या आगोदरच महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची भूमिका काय आहे? याबाबत मला माहिती नाही. त्यांचं मत ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत मांडेन." नबाव मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावरील खटला अजूनही सुरू आहे. सभागृहात कोणी कुठं बसावं, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक यांनी ते कोणासोबत आहेत याबाबत अद्याप मत व्यक्त केलेलं नाही.

मलिक यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत आपल्याला जे करावं लागेल ते आपण करु. याबाबत माध्यमांनी सांगण्याचं कारण नाही, असा भूमिका त्यांनी मांडली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यावर एकामागून एक प्रश्नांचा भडीमार केला. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवाब मलिक हेही विधिमंडळात उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर मलिक यांनी मात्र कायदेशीर कारण सांगून बोलण्यास नकार दिला.

महायुतीत बिघाडी : नवाब मलिका यांच्यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचं सध्या दिसून येत आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळं त्यांनी अजित पवार गटाबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच माध्यमांशी बोलू, असं मत एरवी माध्यमांशी मोकळेपणाने बोलणाऱ्या अजित पवार गटाचे नेता अमोल मिटकरी व्यक्त केलं. "मलिक यांच्या बैठकीची व्यवस्था विधानसभा अध्यक्षांनी केली असेल, तर त्यांना त्याबद्दल अधिक माहिती असावी. नवाब मलिक हे पक्षाचे प्रवक्ता आहेत. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत काल भूमिका स्पष्ट केलीय. मलिक यांच्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आपली भूमिका स्पष्ट करतील," असंदेखील मिटकरी यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. इकबाल मिरचीसोबत प्रफुल्ल पटेल यांचे संबंध-नाना पटोले
  2. मनोज जरांगे पाटलांना जोरदार धक्का, आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास गृहमंत्री फडणवीसांचा नकार
  3. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, मोईत्रा यांची खासदारकी होणार रद्द?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.