ETV Bharat / state

Ajit Pawar on OBC : भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे, ढोंगी लोकांचा पडदा पाडण्याचे काम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे- अजित पवार - ओबीसी मंडळ आयोग

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने बंटीया आयोगाची निर्मिती केली होती. आज भलतेच लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी ओबीसी मंडळ आयोगाला विरोध केला, त्या ढोंगी लोकांचा पडदा पाडण्याचे काम हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. ते नागपुरात राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते.

Ajit Pawar News
अजित पवार
author img

By

Published : Jun 4, 2023, 1:04 PM IST

नागपुरात राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात अजित पवारांचे भाषण

नागपूर : राज्यातील राजकारण हे दिवसेंदिवस चिघळत आहे. येणाऱ्या सार्वत्रिक जनगणनेत ओबीसींची गणना केली पाहिजे. कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेतली पाहिजे. अठरापगड जातींना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी गरजेचे राजकारण केले, तसेच आम्हालाही गरजेचे राजकारण करायचे आहे. नवे चेहरे कसे देता येतील? अशा प्रकारचा प्रयत्न आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

गृह विभाग काय करत आहे : जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो आहे, ते कोणी करते याचा शोध घेतला पाहिजे. नागपूरातून अनेक मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. गृह विभाग काय करतो आहे? यामध्ये काय तथ्य आहे? ते शोधले पाहिजे. वस्तुस्थिती शोधली पाहिजे. लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज देशात आणि राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. मोठी गुंतवणूक आणि रोजगार देणारे उद्योग बाहेर निघून गेले. या विदर्भात तर प्रत्येक वेळी हेच बघायला आणि ऐकायला मिळते की, मिहानचे काम पूर्ण व्हायचे आहे, गडकरी साहेबांचे वजन आहे. केंद्रात आणि राज्यात ही सरकार तुमचे आहे. देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत. गेले पाच वर्षे मुख्यमंत्री होते. करा ना मग मिहान गतिमान, आमचा सपोर्ट आहे. विरोध करणारे आम्ही नाहीत, असे ते म्हणाले आहेत.

राज्यातील इतर प्रश्नांकडे लक्ष द्या : राज्यात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. मुख्यमंत्री तर 40 आमदारांना सांभाळण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण तुम्ही ऐकले, ज्यात त्यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. नाव देताना असे नाव द्या की, पुन्हा कोर्टातून कुठेही स्थगिती येता कामा नये, त्याचबरोबर राज्यातील इतर समस्यांकडेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे, असे पवार म्हणाले.

गद्दारी करणारे लोकं पुन्हा निवडणूक जिंकून येत नाही, हे कर्नाटक निवडणुकीत दिसून आले. जे काँग्रेसमधून बाहेर पडले होते ते सर्व हरले. शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेले पुढील निवडणुकीत निवडून येणार नाही. जनता त्यांचा हिशोब करेल पण आपण सुध्दा गाफील राहून चालणार नाही- अजित पवार

जातनिहाय जनगणना करा : जातनिहाय जनगणना करा, हा आमचा आग्रह आहे. नक्की कुणाची लोकसंख्या किती? हे चित्र स्पष्ट होईल. भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे. यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी लावून धरणार आहे. भाजप ओबीसी नेत्यांच्या मागे लागले. त्यांच्यासमोर अडथळे निर्माण करण्याचे काम भाजप करते आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी लावला आहे. महामानवाना कमी कसे लेखायचे? त्यांचे चारित्र्य हनन कसे करायचे, यासाठी एक यंत्रणा काम करत आहे, असेही पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. Ajit Pawar on Seat Allocation: कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्याने...अजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य
  2. Ajit Pawar Solapur Tour : अजित पवारांच्या स्वागताचा पूर्वसंध्येला ज्योतिबा गुंड यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; शिंदे गटात केला प्रवेश
  3. NCP Workers Meeting : पाटणमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा रविवारी मेळावा; अजितदादांची तोफ धडाडणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.