ETV Bharat / state

कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली नागपूर विभागात खरीप हंगाम आढावा बैठक

author img

By

Published : Jun 2, 2020, 8:16 PM IST

कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज खरीप हंगाम संदर्भात नागपूर विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोणती पाच महत्त्वाची पिके घेतली जातात, त्यांची उत्पादकता किती आहे, राज्य आणि देश पातळीवर त्या पिकांची उत्पादकता कमी असेल तर ते वाढवण्याचा दृष्टीने कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे या सर्व बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Agriculture Minister Dada Bhuse
कृषीमंत्री दादा भुसे

नागपूर - राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज खरीप हंगाम संदर्भात नागपूर विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बी-बियाणे आणि खतांची उपलब्धता आणि नियोजन यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सह कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार हे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, त्याची तयारी कृषी विभागाने दर्जेदार बियाणे आणि खतांपासून केली आहे. अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

कृषीमंत्री दादा यांनी घेतली नागपूर विभागात खरीप हंगाम आढावा बैठक

या बैठकीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोणती पाच महत्त्वाची पिके घेतली जातात, त्यांची उत्पादकता किती आहे, राज्य आणि देश पातळीवर त्या पिकांची उत्पादकता कमी असेल तर ते वाढवण्याचा दृष्टीने कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे या सर्व बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

महात्मा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला याचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. काही जिल्ह्यात आठ ते चाळीस टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. कर्ज वितरणाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱयांना सूचनाही दिल्या.

कोरोनाचे संकट बघता यावर्षी बियाणे आणि खत शेतकऱ्यांच्या बांधावर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ५० हजार क्विंटल बियाणे आणि एक लाख टन खते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात नुकतीच टोळधाड आली होती. टोळधाड वाऱ्याच्या दिशेने पुढे जात असून त्यावर उपाय योजना सुरू केल्या असल्याचे देखील ते म्हणले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.