ETV Bharat / state

उड्डाणपूल अपघात : तांत्रिक बाजू तपासल्यानंतर दोषींवर कारवाई करणार - एनएचएआय

author img

By

Published : Oct 20, 2021, 3:24 PM IST

नागपूर-भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी या परिसरात गेल्या सात वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग मंगळवारी (दि. 19) रात्री कोसळला. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकशी समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय व्हिएनआय इन्स्टिट्यूटलाही अपघाताचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी पत्र दिले असल्याची माहिती 'एनएचएआय'चे (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी दिली आहे.

NHAI
एनएचएआय

नागपूर - नागपूर-भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी या परिसरात गेल्या सात वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग मंगळवारी (दि. 19) रात्री कोसळला. घटनेच्या वेळी त्या भागात काम बंद होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकशी समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय व्हिएनआय इन्स्टिट्यूटलाही अपघाताचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी पत्र दिले असल्याची माहिती 'एनएचएआय'चे (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी दिली आहे.

बोलताना राजीव अग्रवाल

2014 सली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारडी ते कळमना या उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सात वर्षात या पुलाचे निर्माणकार्य केवळ 60 टक्केच होऊ शकलेले आहे. नागपूर शहरातील सर्वाधिक व्यस्त परिसर म्हणून या भागाला ओळखले जाते. तरीही अतिशय संथ गतीने त्या पुलाचे निर्माणकार्य सुरू आहे यापूर्वीही या भागात अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला.

लोड बेरिंग फेल झाल्याने अपघात झाल्याची शक्यता

कळमना भागातील पिलर क्रमांक पी-7 आणि पी- 8 च्यावर साडेतीन वर्षांपूर्वी गर्डर टाकण्यात आले होते. काल रात्री अचानक ते गर्डर खाली कोसळून अपघात झाला आहे. प्राथमिक तपासानंतर हा अपघात लोड बेरिंग फेल झाल्याने अपघात झाल्याची शक्यता एनएचएआयचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - 'राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात'; कर्नाटकातील भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.