नागपूर : नागपूर सोहम मध्य भारतातील सेझ स्पेशल इकॉनोमिकल झोन मधील मिहानला लागलेंल ग्रहण आणखी गडद होताना दिसत आहे. टाटा एअरबस पाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये येऊ घातलेला सॅफ्रन ग्रुपचा एक हजार कोटींचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. विमान तसेच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन मिहानमध्ये ( French multinational company Saffron Meehan ) येण्यास उत्सुक होती. परंतु प्रशासनाच्या कासव गतीमुळे मिहान मधील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाऊ लागले आहेत.
सॅफ्रन ग्रुपचा एक हजार कोटींचा प्रकल्प हातून गेला आहे. त्यामुळे ६०० जणांचा रोजगार बुडणार आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसेच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचादेखील समावेश होता.