ETV Bharat / state

'लग्नात जास्त वऱ्हाडी आल्यास होणार कारवाई' - nagpur

कोरोनामुळे सार्वजनीक ठिकाणी गर्दी करु नये, असे शासनाने निर्देश दिले आहेत. यावरुन नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व मंगलकार्यालयांना नोटीस दिली आहे. या नोटीसीनुसार लग्नासाठी बुकींग असल्यास ती रद्द करावी. बुकींग रद्द न केल्यास लग्नकार्यात केवळ 50 जणांचीच उपस्थिती असावी. जर 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंगलकार्यालयात आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे
author img

By

Published : Mar 18, 2020, 9:41 PM IST

नागपूर - सध्या कोरोनामुळे अनेकाना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामाजिक कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ज्यामुळे आगामी काळात ज्याच्या घरी लग्नकार्य आहे. त्यांच्या समोर संकटांचा डोंगरच उभा झाला आहे. कारण. एका लग्नात वर आणि वधू पक्ष मिळून 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी दिसून आल्यास मंगल कार्यालय मालकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.

माहिती देताना पालिका आयुक्त

मंगल कार्यालयांनी एक तर लग्नाचे बुकिंग रद्द कराव्यात किंवा लग्नात फक्त 50 पाहुणे असतील याची काळजी घ्यावी. उद्यापासून (गुरुवार) नागपुरात होणाऱ्या कोणत्या ही लग्नात 50 पेक्षा जास्त पाहुणे असल्यास संबंधित मंगल कार्यालयाला जबाबदार मानून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

आज महापालिकेच्या वतीने सर्व मंगल कार्यालयांना नोटीस बजावण्यात आले असून यासंदर्भात निर्देश देण्यात आल्याचे मुंढे म्हणाले. आतापर्यंत नागपुरात 4 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात असलेले 90 रुग्णांची तपासणी केली असून ते निगेटिव्ह आढळल्याचे मुंढे म्हणाले. तसेच ज्यांना होम क्वॉरंटाईन केले आहे. त्यांच्याकडे पालिकेच्या कंट्रोल रूममधून दिवसातून दोन वेळा फोन करून माहिती घेतली जात आहे. तर आरोग्य पथकातील कर्मचारी एकदा त्यांच्या घरी जाऊन ते घरीच असल्याची खात्री करत आहेत. नागपुरात आतापर्यंत 10 देशातून भारतात परतलेल्या 27 नागरिकांना सध्या नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाईन ही केले केल्याचे ही मुंढे म्हणाले.

हेही वाचा - कोरोना विषाणू : नागपुरात तीन दिवसांसाठी लाॅकडाऊन...'या' ठिकाणांना लागणार टाळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.