ETV Bharat / state

नागपुरात मास्क न घालणाऱ्या २०,९४७ नागरिकांवर कारवाई ; आत्तापर्यत तब्बल ८८ लाखांचा दंड वसूल

author img

By

Published : Nov 23, 2020, 8:35 PM IST

आत्तापर्यत २०,९४७ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून तब्बल ८८ लाख ३२ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील विविध भागात मनपाच्या उपद्रव पथकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

नागपुरात मास्क न घालणाऱ्या २०,९४७ नागरिकांवर कारवाई ; आत्तापर्यत तब्बल ८८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

नागपूर - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वत्र मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. अशा अनेक शहारांमधे विनामास्क फिरणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. नागपुरातही महानगरपालिकेच्या उपद्रव पथकाकडून जोरदार कारवाई केल्या जात आहेत. आत्तापर्यत २०,९४७ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून तब्बल ८८ लाख ३२ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील विविध भागात मनपाच्या उपद्रव पथकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी होताच अनेक लोक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा लोकांवर मनपा प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. गेली ६-७ महिन्यांपासून ही मोहीम जोरात सुरू आहे. प्रत्येक दिवशी मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून २०० ते ३०० नागरिकां विरोधात विनामास्कची कारवाई करण्यात येते आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रूपये इतका दंड वसूल करण्यात येत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनसुद्धा विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील धरमपेठ, हनुमान नगर, सतरंजीपुरा, लकडगंज, गांधीबाग यासह इतरही भागात दररोज ही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आत्तापर्यत या कारवाईतून मोठी रक्कम मनपा प्रशासनाला मिळाली आहे. शिवाय बेजबाबदारपणे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मनपाकडून वारंवार मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागपूरकर या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अनेक सामाजिक स्थळी, कार्यक्रम स्थळी नागरिक विनामास्क पाहायला मिळत आहे. अशावेळी कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुरात काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या खरेदीसाठी उसळलेली गर्दी आणि विनामास्क फिरणारे नागरिक हे सर्वानी अनुभवले होते. त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांनी वेळीच कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला वेळ लागणार नाही, अशीच काही स्थिती पाहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.