ETV Bharat / state

कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या नर्सिंग विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन - अभाविप आंदोलन नागपूर बातमी

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहे. अशावेळी या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. परंतु याच आरोग्य यंत्रणेतील बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले.

वैद्यकिय अधिक्षकांना दिले निवेदन
वैद्यकिय अधिक्षकांना दिले निवेदन
author img

By

Published : Sep 23, 2020, 7:39 PM IST

नागपूर : कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना हातभार म्हणून आरोग्य विभागात काम करणाऱ्यांनी सेवेत रुजू व्हा, असे आवाहन राज्य शासनाने केले होते. यात बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यांना सर्व सोयीसुविधा व निर्वाह भत्ता देऊ, असेही सांगितले. मात्र, त्या सुविधा प्रत्यक्ष मिळत नसल्याचे सांगत, नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

नर्सिंग विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहे. याच यंत्रणेत असणाऱ्या बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरात हे आंदोलन करण्यात आले. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, मोफत भोजन व्यवस्था यासह इतर सुविधा द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवाय या विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

सेवेदरम्यान विद्यार्थी संक्रमित झाले तर त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी वेगळी सोय करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी अभाविपकडून करण्यात आले. शिवाय या मागण्यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गांवडे यांना निवेदन देत, या मागण्या तत्काळ पूर्ण करा अशी विनंतीही या निवेदनातून करण्यात आली. तसेच, या मागण्यांचे निराकरण झाले नाही तर, यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशाराही यावेळी अभाविपकडून देण्यात आला.

हेही वाचा - खराब रस्त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू; नागपुरातल्या पारडी परिसरातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.