ETV Bharat / state

छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नागपुरात आत्महत्या - छत्तीसगड अधिकारी आत्महत्या न्यूज

छत्तीसगड सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपूरमध्ये आत्महत्या केली. बुधवारी रात्री ही घटना समोर आली. या अधिकाऱ्याने आत्महत्या का केली, याबाबत सीताबर्डी पोलीस तपास करत आहेत.

Chhattisgarh officer Suicide News
छत्तीसगड अधिकारी आत्महत्या न्यूज
author img

By

Published : Mar 4, 2021, 10:35 AM IST

नागपूर - छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात विष पिऊन आत्महत्या केली. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूजा लॉजमध्ये हा प्रकार घडला. राजेश श्रीवास्तव, असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे सहसचिव पदावर कार्यरत होते. ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केली

काय आहे घटना -

राजेश श्रीवास्तव हे सीताबर्डी बाजार परिसरात असलेल्या पकोडेवाली गल्लीच्या शेजारी असलेल्या पूजा लॉजमध्ये थांबलेले होते. बुधवारी यांसकाळपर्यंत त्यांनी खोलीचे दार उघडले नसल्याने लॉजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शंका आली. त्याने अनेक वेळा दार वाजवले मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाला सूचना दिली. त्यांनी देखील प्रयत्न करून बघितला मात्र आतून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही. व्यवस्थापकांनी या घटनेची माहिती सीताबर्डी पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठले आणि दार तोडून आत प्रवेश केला. राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. सीताबर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.