नागपूर - सफाई कर्मचारी सफाईसाठी निघाला असता अज्ञांतांनी कचरा टेम्पो अ़डवून भरसस्त्यात त्याची हत्या केली. तो सफाई कर्मचारी कामठी नगर परिषदेच्या अंतर्गत करत होता. कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवान मंदिराजवळ हा प्रकार घडला. हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजत आहे.
हेही वाचा - साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले
सतिश धामती असे सफाई कामगाराचे नाव आहे. प्राथमिक माहीतीनुसार सतिश कामावर जात असताना काही अज्ञातांनी आरोपीची वाट अडवून त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी जखमी अवस्थेत कामगाराला नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सतिशची हत्या जुन्या वादातून झाल्याची शंका व्यक्त केली जात असल्याने कामठी पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - जालन्यात शेतात झोपलेल्या वृद्धाची डोक्यात दगड घालून हत्या, कारण अस्पष्ट