नागपूर - हॉटेलमध्ये शिरून अज्ञात आरोपींनी तरुणाची धारदार शस्त्राने केली हत्या केल्याची घटना शहरात घडली आहे. समीर शेख असे मृ तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत.
हेही वाचा - आज भारत बंद! 25 कोटी कामगार जाणार संपावर..
शहरातील यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकात असणाऱ्या आर. के. सावजी हॉटेलमध्ये समीर शेख हा आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेला होता. त्याच वेळी त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत समीरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर,आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहे. मृत समीर शेख हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.