ETV Bharat / state

थरारक... शेकडोंच्या डोळ्यादेखत एका प्रेमाचा करुण अंत

नागपूर रेल्वे स्थानकावर ओव्हर हेड केबलला स्पर्श करून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना काल रात्री १०.३० च्या सुमारास घडली होती.

nagpur
शेकडोंच्या डोळ्यादेखत एक प्रेमाचा करून अंत
author img

By

Published : Dec 10, 2019, 2:09 PM IST

नागपूर- नागपूर रेल्वे स्थानकावर ओव्हर हेड केबलला स्पर्श करून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना काल रात्री १०.३० च्या सुमारास घडली होती. सदर व्यक्ती रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचवर चढला व त्याने ओव्हरहेड केबलला स्पर्श केले. त्याची पत्नीसुद्धा आत्महत्या करण्यासाठी डब्यावर चढली होती. मात्र, सुरक्षा रक्षकांनी कसे बसे तिला वाचवण्यात यश मिळविले. हा संपूर्ण घटनाक्रम रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

माहिती देताना नागपूर रेल्वे पोलीस अधिक्षक भवानी शंकर नाथ

नागपूर रेल्वे स्थानकावर काही प्रवाशी आपल्या रेल्वे गाडीची वाट बघत होते. अचानक अरे धावा-धावा, वाचवा-वाचवा, ते दोघे आत्महत्या करत आहे अशा प्रकारच्या किंचाळ्यांनी नागपूर रेल्वे स्थानक थरारून गेले. ज्यांच्या नजरेत ही घटना पडली त्यांच्या मुखातून किंचाळ्या निघताच रेल्वे स्थानकावर उपस्थित सर्वांच्या नजरा ट्रेनच्या छताकडे रोखल्या गेल्या होत्या. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका विशेष गाडीच्या छतावर एक नव विवाहित जोडपे आत्महत्या करण्यासाठी चढले होते. या घटनेत बिरबल कुथ्थू पहारिया या तरुणाने ओव्हर हेड वायरला स्पर्श करून आत्महत्या केली. तर त्याची पत्नी ज्ञानदेवी थोडक्यात बचावली.

बिरबल आणि ज्ञानदेवी या दोघांनी प्रेम विवाह केल्यानंतर त्यांनी पळून जाऊन संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वीच या प्रेमीयुगुलाने घर सोडले. डोंगरगढला उतरल्यानंतर ते थांबले नंतर नागपूरला आले. दरम्यानच्या काळात त्यांनी सोबत आणलेले पैसे संपले. त्यामुळे त्यांना पोट भरणेही कठीण झाले होते. या दरम्यान बिरबल आणि ज्ञानदेवी हे दोघेही नागपूर ते डोंगरगढ आणि डोंगरगढ ते नागपूर असा प्रवास करीत होते. आता जगायचे कसे? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता. यातून दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला.

दोघेही नागपूर रेल्वे स्थानकावर आले. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अचानक इटारसी एन्डकडे फलाट क्रमाक एकवरील जिन्यावर चढले. त्याच वेळी फलाट क्रमांक एकवर विशेष गाडी थांबली होती. त्या गाडीत प्रवासी म्हणून रेल्वे कर्मचारी होते. त्या दोघांकडे प्रवाशाचे लक्ष गेले. प्रवाशांनी आरडा-ओरड केली. एकच ओरड झाल्याने लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. जवानांकडून दोघांनाही खाली उतरण्याची विनवणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी एफओबीच्या जिन्याला असलेली लोखंडी ग्रील तोडली. त्याचवेळी ऑटोचालकांचे नेते अलताफ अंसारी हे तोडलेल्या ग्रीलमधून छतावर चढले. परंतु, बिरबल तिला सोडत नव्हता. अलताफने त्याच्याजवळून तिला वेगळे करीत खाली उतरविले. मात्र, त्याच वेळी बिरबलने फलाट क्रमांक एकवर थांबलेल्या विशेष रेल्वे गाडीच्या छतावर उडी घेतली.

घटनेची गंभीरता लक्षात घेता उपस्टेशन व्यवस्थापकाला माहिती देवून इंजिनला वीज पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिणीचा (ओएचई) वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. मात्र, त्या दरम्यान बिरबल एका डब्याहून दुसऱ्या डब्यावर उड्या मारत होता. सुमारे एक तास हा प्रकार सुरू होता. एका क्षणी त्याने दोन्ही हातांनी वीज वाहिनीला पकडले. वीजपुरवठा खंडित असला तरी तारांमध्ये राहिलेल्या वीजेचा भार सोसन्यापलिकडे होता. बिरबलने ताराला हात लावताच तो चिटकला. अंसारी यांनीच लाकडी दांड्याने त्याला सोडविले. पण, त्याने छतावरून खाली उडी घेतली. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या काही दिवसातच विधवा झालेल्या ज्ञानदेवीला शासकीय वसतीगृहात पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा- नागपूरमध्ये चिमुरडीच्या हत्येनंतर आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

Intro:नागपूर रेल्वे स्टेशनवर उभ्या एका एक्सप्रेसच्या स्लीपर क्लास डब्यावर चढून एक इसमाने ओव्हर हेड केबलला स्पर्श करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे...या इसमाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याची पत्नी सुद्धा आत्महत्या करण्यासाठी डब्यावर चढली होती,मात्र सुरक्षा रक्षकांना कसे बसे तिला वाचवण्यात यश आले,त्याला वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...हा संपूर्ण घटनाक्रम रेल्वे स्टेशनवरील प्रवाश्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे Body:नागपूर रेल्वे स्टेशन वर काही प्रवाशी आपल्या रेल्वे गाडीची वाट बघत होते,तर काही प्रवासी आलेल्या गाडीतून उतरून आपल्या गंतव्य ठिकाणी जाण्याची तयारी करत होते तर काही प्रवासाला सुरवात करण्याची तयारी करत असताना अचानक
अरे धावा,धावा..वाचवा,वाचवा..ते दोघे आत्महत्या करताहेत,अश्या प्रकारच्या किंचाळयांनी नागपूर रेल्वे स्टेशन थरारून गेले...ज्यांच्या नजरेत ही घटना पडली त्यांच्या मुखातून किंचाळ्या निघताच स्टेशनवर उपस्थित सर्वांच्या नजरा ट्रेनच्या छताकडे रोखल्या गेल्या होत्या...स्टेशनवर उभ्या असलेल्या एका विशेष गाडीच्या छतावत एक नवविवाहित जोडपं आत्महत्या करण्यासाठी चढले होते...या घटनेत बिरबल कुथ्थू पहारिया या तरुणाने ओव्हर हेड वायरल स्पर्श करून आत्महत्या केली आहेत,तर त्याची पत्नी ज्ञानदेवी थोडक्यात बचावली... बिरबल आणि ज्ञानदेवी या दोघांनी प्रेम विवाह केल्यानंतर त्यांनी पळून जाऊन संसार थाटण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वीच घर सोडले. डोंगरगढला उतरल्यानंतर ते थांबले. नंतर नागपूरला आले. सोबत आणलेले पैसे संपले. पोट भरणेही कठीण झाले. नागपूर ते डोंगरगढ आणि डोंगरगढ ते नागपूर असा ते प्रवास करीत होते. आता जगायचे कसे? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता. यातून दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. दोघेही नागपूर स्थानकावर आले. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अचानक इटारसी एन्डकडे फलाट क्रमाक १ वरील छतावर (जीन्या जवळील) चढले. त्याच वेळी फलाट क्रमांक एकवर विशेष गाडी थांबली होती. त्या गाडीत प्रवासी म्हणून रेल्वे कर्मचारी होते. त्या दोघांकडे प्रवाशाचे लक्ष गेले. प्रवाशांनी आरडा ओरड केली. एकच ओरड झाल्याने लोहमार्ग पोलिस, आरपीएफचे जवानांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. दोघांनाही खाली उतरण्याची विनवनी करीत होते. दरम्यान पोलिसांनी एफओबीच्या जीन्याला असलेली लोखंडी ग्रील तोडली त्याच वेळी ऑटोचालकांचे नेते अलताफ अंसारी हे तोडलेल्या ग्रील मधून छतावर चढले, परंतु बिरबल तिला सोडत नव्हता. अलताफने त्याच्याजवळून तिला वेगळे करीत खाली उतरविले. मात्र, त्याच वेळी बिरबलने फलाट क्रमांक एकवर थांबलेल्या विशेष रेल्वे गाडीच्या छतावर उडी घेतली. घटनेची गंभीरता लक्षात घेता उपस्टेशन व्यवस्थापकाला माहिती देवून इंजिनला वीज पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिणीचा (ओएचई) वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. तो एका डब्याहुन दुसऱ्या डब्यावर उड्या मारत होता. सुमारे एक तास हा प्रकार सुरू होता. एका क्षणी त्याने दोन्ही हातांनी वीजवाहिनीला पकडले. वीजपुरवठा खंडित असला तरी तारांमध्ये राहिलेल्या वीजेचाभार सोसन्यापलिकडे होता....बिरबल ने त्या ताराला हात लावताच तो तिथेच चिपकला....अंसारी यांनीच लाकडी दांड्याने त्याला सोडविले. पण, त्याने छतावरून खाली उडी घेतली. यामुळे डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या काही दिवसातच विधवा झालेल्या ज्ञानदेवीला शासकीय वसतीगृहात पाठविण्यात आले.

बाइट - भवानी शंकर नाथ - SP रेल्वे सुरक्षा बलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.