ETV Bharat / state

इअरफोन्स लावून रुळावरून चालताना रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

इअरफोन्स लावून गाणी ऐकणे जवळपास सर्वांनाच आवडते. मात्र, ही सवय कधी-कधी जीवावरही बेतते. असाच प्रकार सावनेर तालुक्यातील रेल्वे लाईनवर घडला आणि यामध्ये यश गढवाल या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Dead Body
मृतदेह
author img

By

Published : Dec 6, 2020, 12:08 PM IST

नागपूर - रेल्वेच्या रुळावर चालताना इअरफोन्स लावून गाणी ऐकणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील छिंदवाडा मार्गावर घडली. यश गढवाल (वय २२)असे या तरुणाचे नाव आहे. तो रेल्वे रुळावर चालत असताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत होता. त्याच वेळी पाठी-मागून आलेल्या रेल्वेचे हॉर्न त्याला ऐकू आले नाही. त्यामुळे रेल्वे यशला धडक देऊन पुढे निघून गेली. या अपघातात यशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

यश गढवाल आपल्या कुटुंबासह सावनेर येथे राहत होता. तो बॅनर आणि होर्डिंग लावण्याचे काम करत असे. काल संध्याकाळी तो रेल्वे रुळावर फिरत असताना मागून आलेल्या रेल्वेने त्याला जोरदार धकड दिली दिली. या अपघातापूर्वी लोको पायलटने गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न करत अनेक वेळा हॉर्नदेखील वाजवला मात्र, त्याचा काहीही उपायोग झाला नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

तरुणांमध्ये इअरफोन्स लावून गाणी ऐकण्याचे प्रमाण वाढत आहे -

सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मोबाईल आणि इअरफोन्स ही दोन साधने आजच्या तरुणांच्या जगण्याचे महत्वाचे घटक झाले आहे. उठता-बसता, काम करताना, गाडी चालवताना असो की पायी फिरताना देखील कानात इअरफोन्स लावून मिरवणारे तरुण सर्रास दिसतात. दोन्ही कानात इअरफोन्स लावल्यानंतर मागून आणि पुढच्या भागातून कोणती गाडी येते आहे, याचे भान देखील तरुणांना नसते. असाच प्रकार सावनेर तालुक्यातील रेल्वे लाईनवर घडला आणि यामध्ये यश गढवाल या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.