ETV Bharat / state

नागपूरकरांनो आता तरी सावध व्हा.. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तीन दिवसात ११३ रुग्णांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात तब्बल ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये २२ मार्च रोजी सर्वाधिक ४० तर २३ मार्चला ३३ रुग्ण कोरोनावरील उपचार घेताना दगावल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २४ मार्च रोजी सुद्धा ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्याने नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती किती भीषण झालेली आहे याचा अंदाज येईल.

nagpur corona
nagpur corona
author img

By

Published : Mar 24, 2021, 6:56 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात तब्बल ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये २२ मार्च रोजी सर्वाधिक ४० तर २३ मार्चला ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेताना दगावल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २४ मार्च रोजी सुद्धा ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्याने नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती किती भीषण झालेली आहे याचा अंदाज येईल. नागपुरात मृत्यूच्या वाढलेल्या आकड्यांमुळे सामान्य नागपूरकरांसोबतच प्रशासनासाठी देखील अत्यंत चिंता वाढलेली आहे. नागपूरात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे, त्या तुलनेत मृत्यू देखील होत आहेत. या मागील नेमकं कारणे काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.

लक्षणं अंगावर काढणे धोकादायक -

लोकांमध्ये कोरोना बद्दल भीती उरलेली नसल्यामुळे हा आकडा वाढत असल्याचे चित्र नागपुरात बघायला मिळत आहे. याशिवाय नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर देखील सुरुवातीचे काही दिवस औषधोपचार करून घरीच राहण्याला नागरिक प्राधान्य देतात. ज्यावेळी तब्येत जास्त खालावते तेव्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतला जातो. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे वाढत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे.

कोरोनाबाबत माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक
हे ही वाचा - बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन
३३ हजार अ‌ॅक्टीव्ह रुग्ण -
उपराजधानी नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिक कोरोनाबाधित होत असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या कोविड कक्षातील खाटा फुल्ल झाल्या आहेत. सध्या नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३३,५०० हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना खाटा मिळत नसल्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. परंतु नागरिक ते करीत नसल्याने नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे बघायला मिळत आहे.
प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र नागरिकांची मुजोरी -
नागपुरात कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नागपुरात काही कोरूना बाधित रुग्ण अथवा त्यांच्या परिवारातील लोक घराबाहेर फिरत असल्याचे दिसून आलेले आहे. अशा नागरिकांची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी प्रशासनाला द्यावी तसेच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे सुद्धा प्रशासनातर्फे सांगण्यात आलेले आहे. प्रशासनाकडून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, मात्र पॉझिटिव्ह रुग्ण या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.