ETV Bharat / state

Winter Session 2022 : राज्य सरकारची 70 हजार कोटीं गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी; आरोप-प्रत्यारोपाने गाजले अधिवेशन

विधानसभेत मराठवाडा विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्यावर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्य सरकारने 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना ( 70 thousand crore investment projects ) मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतून ४५ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती दिली.

Winter Session
Winter Session
author img

By

Published : Dec 30, 2022, 10:19 PM IST

नागपूर - विधानसभेतील विरोधी पक्षनेते, अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter session ) शेवटच्या दिवशी सभागृहात केलेल्या भाषणावर 'असंतोष' व्यक्त केला. भ्रष्टाचारात गुंतल्याचे 'पुरावे' असूनही चार मंत्र्यांना ' क्लीन चिट' दिल्याचे सांगत पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "आम्ही चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्र्यांसोबत शेअर केले आहेत, परंतु त्यांनी या सर्वांना क्लीन चिट देण्याचा निर्णय घेतला. ते विरोधी पक्षात असते तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती," असे पवार म्हणाले.

शिंदेची आदित्य ठाकरेंवर टीका - आम्ही आदित्य ठाकरेंना घाबरत नाही तसेच उद्धव ठाकरेंना देखील घाबरत नाही. उद्धव ठाकरेंच्या नाकाखाली आम्ही आमदारासह खासदार घेऊन गेलो. तरी देखील ते काहीच करू शकले नाही. मुंबई जळणार असे ते म्हणाले होते, पण माचिसची काडीही जळाली नाही अशी टीक ( Shinde criticism of Aditya Thackeray ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्य सरकारने 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतून ४५ हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत अंतिम प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले की, मंजूर झालेल्या 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांपैकी 44 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या विदर्भात मंजूर करण्यात आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरू- "आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि विरोधकांनी त्याचं कौतुक करायला हवं होतं. पण तसं झालं नाही," असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्य सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांचे कौतुक करतांना ते म्हणाले, "गेल्या अडीच वर्षांत कोरोनामुळे राज्य नैराश्यात गेले आहे. आम्ही आल्यानंतर राज्याच्या प्रगतीसाठी काम केले."विशेष म्हणजे, राज्यभरात 700 बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरू करत आहे.

गेल्या सहा महिन्यांत 18 सिंचन प्रकल्पांना मंजुरी - "गेल्या अडीच वर्षांत फक्त एक सिंचन प्रकल्प मंजूर झाला. गेल्या सहा महिन्यांत आम्ही 18 सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. अडीच लाख हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला," असा दावा शिंदे यांनी केला. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या माहीत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहाला संबोधित करताना शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर दिले. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर चर्चेच्या विरोधकांच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले होते, "तुम्ही आमच्या महापुरुषांचा अपमान करत असल्याची टीका केली. पण शिवाजी महाराजांच्या वंशजांना कोणी सिद्ध करायला सांगितले? ते कोणाचे वंशज आहेत म्हणुन? तुम्हाला महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांचे चित्र सभागृहात लावता आले नाही. ते आम्ही करुन दाखवले तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र विधानसभेत लावले असलाचे ते म्हणाले.

आगामी निवडणुका भाजपसोबत - शिवसेना (शिंदे गट) आगामी निवडणुका भाजपसोबत युती करून लढेल असे देखील शिंदे म्हणाले." या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आम्ही भाजप सोबत विधानसभा निवडणुका एकत्र लढू. आम्ही जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय उघडू अशी घोषणा त्यांनी केली. शक्ती फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 (ज्यामध्ये मृत्यूदंडाची तरतूद आहे. अॅसिड हल्ला, बलात्कार, सामूहिक बलात्कार यांसारखे काही गुन्हे ) केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रस्तावित सुधारणांवर लवकरच निर्णय घेतला जाईल," असे शिंदे म्हणाले.

विदर्भासाठी महत्त्वाचे निर्णय- “विदर्भातील अधिवेशन विदर्भाला काहीतरी देईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात अधिवेशन झाले नव्हते. त्यामुळे यंदाही हे अधिवेशन होईल की नाही? अशी शंका होती. मात्र, अधिवेशन झाले. मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. विदर्भात अधिवेशन सुरू असताना सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला. बोनसच्या नव्या पद्धतीचा अवलंब केल्याने आणखी शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी अनेक नवीन सिंचन प्रकल्पांची घोषणा केली आहे. अधिवेशनात विदर्भात 35 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विधिमंडळातील कामकाजाची माहितीही दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.