नागपूर - जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नागपुरात गेल्या २४ तासात उपचार घेत असलेले तब्बल ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा २७२ वर पोहोचला आहे. या सर्व रुग्णांना केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नवीन गाईडलाईननुसार डिस्चार्ज मिळाला आहे.
सध्या नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या ३७३ आहे. त्यापैकी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या भागात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.