ETV Bharat / state

५ वी ते ८ वी शाळा सुरू; नागपुरातील काही शाळांमध्ये नव्हत्या कोरोना दक्षता किट

author img

By

Published : Jan 27, 2021, 9:49 PM IST

आजपासून पाच ते आठवा वर्ग असणाऱ्या शाळांना सुरुवात झाली आहे. यात ग्रामीण भागातील शाळांचा समावेश असून, कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांमध्ये आजपासून शिकवणीला सुरुवात झाली.

fifth class schools started Nagpur
कोरोना दक्षता साहित्य शाळा

नागपूर - आजपासून पाच ते आठवा वर्ग असणाऱ्या शाळांना सुरुवात झाली आहे. यात ग्रामीण भागातील शाळांचा समावेश असून, कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांमध्ये आजपासून शिकवणीला सुरुवात झाली. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थी पोहचले असले, तरी काही शाळांमध्ये थर्मल स्कॅनर, ऑक्सिजन मीटर, भित्ती पत्र पोहचले नाही.

माहिती देताना वाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक

हेही वाचा - लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहायक वस्त्रोद्योग आयुक्तांना अटक

नागपूर जिल्ह्यामध्ये साधारण अठराशेच्या घरात शाळा आहे. या शाळांची दीड लाखाच्या घरात पटसंख्या आहे. तेच या विद्यार्थ्यांना शिकवणारे साधारण 16 हजार शिक्षक आहेत. यात 33 हजार 916 विद्यार्थी व 5 हजार 854 शिक्षक हे पहिल्या दिवशी उपस्थित होते. यात 5 हजार 797 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झाली असून यात 65 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

काय काळजी घ्यायची होती....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना काही महत्वाच्या बाबींचे पालन करायचे होते. यात शाळा निर्जंतुकीकरण करून घेणे, यासोबत वर्गखोलीत सामाजिक अंतर ठेवणे, बसताना झेड पद्धतीने बैठक व्यवस्था करणे, हात स्वच्छ धुणे, पिण्याचे पाणी सोबत आणणे आदी बाबी सांगण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थी, शिक्षक कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गण, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्ती पत्रके आधी वितरित करण्यात येणार होते, पण ते साहित्य जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये पोहचले नसल्याचे वाडी येथील शाळेचा आढावा घेतला असता समोर आले.

साहित्य पुरवण्यासाठी ग्रामपंचायतला दिले पत्र....

या संदर्भात शिक्षणाधिकारी याच्याशी संपर्क केला असता, यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर असणाऱ्या शाळांना ग्रामपंचायतींकडून साहित्य पुरवले जातील, असे पत्र काढण्यात असल्याचे सांगत जबाबदारी ढकलून अंग काढणारा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. यासोबत वाडी येथील भागातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळा ज्या ग्रामपंचायतमध्ये येत नाही, पण नगर परिषद क्षेत्रात येतात, पण अद्याप हस्तांतरण न झाल्याने त्यांना साहित्य कोण देणार? याचे उत्तर शिक्षक मुख्याध्यापक देऊ शकले नाही.

काही ठिकाणी शाळेने घेतले विकत साहित्य....

साहित्य न पोहचल्याने अखेर शाळेच्या मुख्याध्यापकांनी थर्मल स्कॅनर, ऑक्सिजन लेव्हल तपासणी मिटर हे विकत घेतले. तर, काही शाळा विकत घेण्याचा तयारीत आहेत. साहित्य का देण्यात आले नाही, या प्रश्नावर मात्र, ते देण्यात येईल, विकत घेऊ, असेच उत्तर मिळाले. यात नागपूर जिल्ह्याची पटसंख्य पाहता सुरवातीला मोजक्याच पालकांनी संमती पत्र दिल्याने पहिल्या दिवशी गर्दी झाली नाही. हळूहळू संमती मिळून पटसंख्या वाढेल, आणि शाळा पूर्वीप्रमाणे सुरू होतील. मात्र, कोरोना गेला नसल्याने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहेच.

हेही वाचा - 'कपड्यांवरून स्पर्श लैंगिक अत्याचार ठरत नाही' नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.