ETV Bharat / state

नागपूरात 55 हजार को-वॅक्सिनचा साठा दाखल; बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू

नागपूर जिल्ह्याला आतापर्यंत 4 लाख 5 हजार 800 कोरोना डोस मिळाले होते. आता पुन्हा 55 हजार 360 डोस उपलब्ध झाल्यामुळे शहरात पुन्हा लसीकरण मोहीमेला सुरूवात होणार आहे.

कोरोना डोस
कोरोना डोस
author img

By

Published : Apr 9, 2021, 4:02 PM IST

Updated : Apr 9, 2021, 4:44 PM IST

नागपूर -कोरोना वॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने शहरातील काही लसीकरण केंद्रांवर साठा उपलब्ध नसल्याचे बोर्ड झळकत होते. पुण्यातून एक कंटेनर 55 हजार 360 को वॅक्सिन घेऊन नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात दाखल झाला आहे. यामुळे गुरुवारी दुपारपासून बंद असलेले लसीकरण केंद्र शुक्रवारी पुन्हा सुरू झाले आहेत.

नागपूरात 55 हजार को-वॅक्सिनचा साठा दाखल

सहा केंद्रावर साठा उपलब्ध नसल्याचे बोर्ड
नागपूर शहरात सहा सेंटर आहे. मात्र, गुरुवारी दुपारपासून कोरोना लसीचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रावरून लासदात्यांना परत जावे लागले होते. यामुळे केंद्रांवर लसीकरण थांबवण्यात आल्याचे फलक लावण्यात आले होते. किमान लस उपलब्ध कधी होणार हे सांगण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लस घेण्यासाठी आलेल्या डॉ. सुभाश राऊत यांनी केली होती. जेणेकरून या वयोवृद्ध नागरिकांना येऊन परत जाण्याचा त्रास होणार नाही.

हेही वाचा - "पहचान कौन? म्हणत शायरीद्वारे अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

शुक्रवारी सकाळी वॅक्सिन कंटेनर दाखल
गुरुवारी दुपारी पुणे येथून अनेक जिल्ह्यात भारत बायोटेकच्या को वॅक्सिन भरलेल कंटेनर निघाले होते. ते आज (शुक्रवार) नागपूरसह अनेक जिल्ह्यात पोहचले असून यातून लसीकरण साठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंतची स्थिती

जिल्ह्यात आतापर्यंत कोविशील्डचे 4 लाख 5 हजार 800 डोसेज मिळाले आहेत. तर 22 हजार 800 डोसेज को को वॅक्सिन मिळाले होते. जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपर्यंत लसीकरण मोहिमेत 2 लाख 77 हजार 842 जणांना पहिला डोस यशस्वीपणे देण्यात आला आहे. तर 24 हजार 28 जणांना दुसरा डोज देण्यात आला असून 3 लाख 1 हजार 870 लस देण्यात आली आहे. यामध्ये गुरुवारी 14 हजार 357 जणांना लस देण्यात आली. यामध्ये 13 हजार 150 जणांना पहिला डोज देण्यात आला असून 1207 जणांनी लस घेतली आहे.

हेही वाचा - लग्नाच्या पहिल्या रात्री घेतली कौमार्य चाचणी, अपयशी ठरल्याने कोल्हापुरच्या २ बहिणींना पाठवले माहेरी

Last Updated : Apr 9, 2021, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.