ETV Bharat / state

Small Boy Body Found Nagpur : कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; पोलीस तपास सुरु - बॉबीचा मृतदेह कोलार नदीत सापडला

चार वर्षीय चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. बॉबी कुठेही दिसत नसल्याचे त्याच्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण कोराडी परिसर पिंजून काढला आहे. मात्र बॉबीचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे बॉबी हरवल्याची तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

घटनास्थळाचे छायाचित्र
घटनास्थळाचे छायाचित्र
author img

By

Published : Jan 3, 2022, 9:11 PM IST

नागपूर - कोराडी परिसरातून दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये सापडला आहे. कोराडी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे.

बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर हा चार वर्षीय चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. बॉबी कुठेही दिसत नसल्याचे त्याच्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण कोराडी परिसर पिंजून काढला आहे. मात्र बॉबीचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे बॉबी हरवल्याची तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून बॉबीचा शोध घेतला. मात्र पोलिसांना सुद्धा बॉबीचा कोणताही सुगावा लागला नाही. मात्र आज बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये मिळाला आहे.

अपघात की घातपात? तपास सुरू

१ जानेवारी रोजी बॉबी त्याच्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे ३ जानेवारीला त्याचा मृतदेह कॅनलमध्ये मिळून आला आहे. संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. बॉबीचे अपहरण केल्यानंतर कुणी त्याची हत्या केली का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा - भिवंडीतील चिंबीपाडा आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांसह २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.