नागपूर - शहरात भरधाव गाडी चालवत मद्यधुंद कारचालकाने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जवळपास ४ दुचाकीस्वारांना उडवले. यामध्ये चालकासह एकूण ४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
टी. के. रवींद्र (वय ५५) असे आरोपी वाहन चालकाचे नाव आहे. तो मद्य प्राशन करून कार चालवत होता. सर्वात आधी आठ रस्ता चौकावर एका दुचाकीस्वाराला उडवले. त्यानंतर अशोक हॉटेलसमोर काही जणांना धडक दिली. एवढ्यावरच न थांबता लक्ष्मीनगर चौकामध्ये स्वत: दुभाजकावर धडकला. याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.