नागपूर - महाविकास आघाडीचे पहिले अधिवेशन नागपूरमध्ये पार पडले. १६ डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनाच्या कालवधीत विधानपरिषदचे कामकाज हे ३४ तास ३९ मिनिटे चालले. अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सरसकट 2 लाखाच्या कर्जमाफीच्या घोषणेने अधिवेशनाची सांगता झाली.
मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विदर्भाचा दौरा करत पाहणी केली होती. यामुळे हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गाजणार हे चित्र स्पष्ट झाले होते. पहिल्याच दिवशी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली.
पहिले दोन दिवस कामकाज बंद पाडण्यात विरोधकांना यश आले. विषय होता कर्जमाफी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईसाठीचा. तिसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशन हे सहा दिवस चाललले असले तरी प्रत्यक्षात मात्र, ६ दिवासात 34 तास 39 मिनिट कामकाज झाले.
विधानपरिषदेत ६ दिवसात झालेल्या कामकाजाचा आढावा
34 तास 39 मिनिटे कामकाज झाले. नियम 93 अंतर्गत 27 सूचना परिषदेच्या सदस्य आमदारांकडून मांडण्यात आल्या. यापैकी 15 सूचना सभापतींकडून मांडण्यात आल्या. लक्षवेधी सूचना 509 देण्यात आल्या. यात 139 मान्य करण्यात आल्या. यापैकी 39 मुद्द्यांवर सभागृहात चर्चा झाली असून त्यात आमदारांनी सूचना करत बाजू मांडली. विशेष उल्लेख 113 सूचना ठेवण्यात आल्या. यापैकी 78 सूचना मांडण्यात आल्यात.
नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा दोन विषयावर घेण्यात आली. यात दोन्ही सूचना मान्य करण्यात आल्या. यात अवैध सावकारांना रोखण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली. त्यांच्या आमदार अध्यक्ष विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. नियम 46 अन्वये 3 निवेदन मंत्र्यांच्या वतीने मांडण्यात आले. यात 2 अशासकीय विधेयक मांडण्यात आले असून, दोनही विधेयक संमत करण्यात आले.
289 अन्वये 89 सूचना मांडण्यात आल्यात. 289 केव्हा आणि कसे मांडावे यावरून सभापतींनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. याचा गैरवापार होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला. यासह नियम 260 अन्वये 2 सूचना प्राप्त झाल्या होत्या. यात 1 विषयावर चर्चा झाली.