नागपूर - धुलीवंदन नंतर नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचा बघायला मिळाली होती. मात्र केवळ एक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी परत नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासात नागपूरमध्ये २ हजार ८८५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर मृत्यूचे आकडे वाढत असताना देखील पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा - अन् आरपीएफ जवानांमुळे वाचले दोघांचे प्राण; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - नागपुरात संचारबंदीविषयी पालकमंत्री नितीन राऊत यांची महत्वपूर्ण घोषणा