ETV Bharat / state

Bus Accident in Buldhana : बसच्या फिटनेससोबतच प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष; गमवावा लागला जीव

बुलढाण्याजवळील सिंदखेड राजा येथे रात्री उशिरा विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला (Bus Accident in Buldhana) अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना टायर फुटल्याने बसला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बसच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bus Accident in Buldhana
Bus Accident in Buldhana
author img

By

Published : Jul 1, 2023, 3:35 PM IST

Updated : Jul 1, 2023, 4:56 PM IST

प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष

नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात (Bus Accident in Buldhana) झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे 26 प्रवाशांचा मृत्यू झाला तर केवळ 3 प्रवासी वाचले. बसचा अपघात झाल्यानंतर बसच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. ट्रॅव्हल्स बसेसना मुख्य प्रवेशद्वारासह दोन आपत्कालीन दरवाजे असणे आवश्यक आहे. याशिवाय खिडकीच्या काचा फोडण्यासाठी हातोडा किंवा इतर लोखंडी वस्तू असणे आवश्यक आहे.

आमच्या गाडीला दोन एमरजन्सी दरवाजे आहेत. काच फोडण्यासाठी देखील सिस्टीम आमच्या बसला आहे. अपघातानंतर बस एका साईडला पलटी झाल्याने प्रवाशी बाहेर पडू शकले नसावेत - बस चालक, खासगी बस

टायर अचानक फुटल्याने बस पलटी : विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची बस पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा येथे बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस पलटी झाली. अपघात झाला, तेव्हा मध्यरात्रीची वेळ होती. या अपघातामुळे प्रवासी बाहेर पडू शकले नसल्याचा अंदाज एका चालकाने व्यक्त केला. प्रवासाला निघण्यापूर्वी दररोज बसची तपासणी केली जाते, असे त्यांनी सांगितले आहे.

बीएस-३ मध्ये सुरक्षेला प्राधान्य : कंपनीकडून बांधण्यात आलेल्या बीएस-3 सिरीजच्या बसेसमध्ये प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या बसेसमध्ये मुख्य दरवाजाशिवाय दोन इमर्जन्सी (आपातकालीन) एक्झिटची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बीएस 4 सिरीजच्या बसेसमध्ये अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध नाही. शिवाय आपल्या हिशोबाने बसची बांधणी केली जाते. सीट्स वाढवण्यासाठी त्या बसेसमध्ये प्रवासी सुरक्षेच्या मानकांकडे दुर्लक्ष केले जाते.

मृतांच्या नातेवाईकांना सरकारची मदत : २६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडियावर संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा -

Last Updated : Jul 1, 2023, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.