नागपूर - बेरोजगारीला कंटाळून एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या ( Young Suicide Unemployment in Nagpur ) केल्याची खळबळजनक घटना नागपुर जिल्ह्यातील उमरेड शहरातील लक्ष्मी नगरमध्ये घडली आहे. पवन नरेंद्र ठाकरे असे मृतक तरुणाचे नाव आहे. पवन याने इंजिनिअरिंग पूर्ण केले होते.
मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा - पवन अभ्यासात हुशार होता. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र कुठेही नोकरी मिळत नसल्याने तो मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा उमरेड परिसरात आहे. पवनच्या आत्महत्येची सूचना मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदन करिता उमरेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे.
मुलगा अभ्यास करत असल्याचा समज - पवन रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, आणि सकाळी उशिरा उठायचा. त्यामुळे त्याला सकाळी कुणीही उठवत नसे, मात्र 12 वाजून गेले तरी तो खोलीच्या बाहेर न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला आवाज दिला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळात नसल्याने दार तोडण्यात आले. तेव्हा पवनने गळफास लावल्याच्या स्थितीत दिसून आला. अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
हेही वाचा - Bhaskar Jadhav On Raj Thackeray : राज ठाकरे अयोध्येत योगींच्या 'टकल्याला' शाई लावणार का? - भास्कर जाधवांचा सवाल