ETV Bharat / state

तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक - नागपूर लेटेस्ट न्यूज

नागपूर हिलटॉप स्टँड परिसरात रात्रीच्या वेळी वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करण्यात आला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक

author img

By

Published : Jan 29, 2021, 12:20 PM IST

नागपूर - जिल्ह्यात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आल्याची घटना घडली होती. एवढेच नाही तर या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आर्यन प्रकाश भेंडे(19), ऋषिकेश राकेश कुमरे(21) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहे.

तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक
तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा....नागपूर हिलटॉप स्टँड परिसरात रात्रीच्या वेळी वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करण्यात आला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या घटनेमुळे समाजातील शांतता भंग होऊ शकते तसेच पुढील काळात गुन्हेगारीसारख्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता अंबाझरी पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उद्देशाने दबदबा निर्माण करण्यासाठी हा प्रकार केल्याचे बोलले जात होते.तलवार जप्तयात दोघांची ओळख पटवत पोलिसांनी अंबाझरी टेकडी परिसरात राहणाऱ्या आर्यन भेंडे, ऋषिकेश कुमरे याला अटक केली. त्या दोघांकडून धारधार तलवार, आणि सत्तूर जप्त केला. यात हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांचे आवाहन
आजकाल बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन फोटो काढले जातात. हे फोटो सोशल मिडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर याची माहिती संबंधित पोलिसांना देण्याचे आवाहनवरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.