ETV Bharat / state

Nagpur Corona: 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू - नागपुरात 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू

नवजात 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचे ह्रदय कमजोर होते. त्यात जन्मानंतर त्याला कोरोना झाला होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्याने हे जग पाहण्याआधीच अखेरचा श्वास घेतला. नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात ही घटना घडली. मध्य प्रदेशच्या शिवनी येथील संबंधीत बाळाची आई आहे. ती प्रसूतीसाठी नागपुरात आली होती.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Jul 4, 2021, 4:49 PM IST

नागपूर - नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात 12 दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. या बाळाची जन्मानंतर पाच दिवसांनी प्रकृती गंभीर झाली होती. त्याला कोरोनाही झाला होता. यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेले सर्वात कमी वयाचे हे पहिलेच बाळ असल्याचे बोलले जात आहे.

बाळाचे ह्रदयही होते कमजोर

मध्य प्रदेशच्या शिवनी येथील महिलेला प्रसूतीसाठी नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती होण्यापूर्वी 20 जूनला कोरोनाची चाचणी करून घेण्यात आली. यामध्ये महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिची प्रसूती सुरक्षित झाली. पण बाळाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्या मुलाचे हृदय कमजोर होते. त्यात पाच दिवसानंतर बाळाला ताप आल्याने प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याचा 26 जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्या बाळाला आयसीयूमध्ये दाखल करून उपचार सुरू झाले. मात्र अगोदरच बाळाची हृदयामुळे प्रकृती नाजूक होतीच, त्यात प्रकृती अजून बिघडली. अखेर सात दिवसांनी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली आहे.

आई कोरोना निगेटिव्ह, मग बाळ पॉझिटिव्ह कसे?

कोरोनाच्या काळात प्रसूतीपूर्वी आईला कोरोना लागण झाली नव्हती. पण प्रसूतीनंतर बाळाची प्रकृती नाजूक होती. याचदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. यामुळे ही लागण नेमकी कशी झाली? हे स्पष्ट होऊ शकले नाही. यात एकतर रुग्णालयात कुटुंबियांकडून किंवा रुग्णालयात हाताळताना कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. शिवाय, एकतर या महिलेला प्रसूतीपूर्वी कोरोनाची लागण झाली असावी. पण, कोरोनाची लागण लक्षणं विरहित राहिल्यास कदाचित ती बाब पुढे आली नासावी, अशीही चर्चा सुरू आहे. पण याचा परिणाम लहान बाळाच्या हृदयावर झाला नाही ना? असाही मतप्रवाह पुढे येत आहे.

ह्रदयाच्या संघर्षापूर्वीच कोरोनाच्या लढाईत हार

पण या मुलाच्या जन्मानंतर त्याचे हृदय नाजूक असल्याने त्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागला असता. त्यापूर्वीच कोरोनाशी संघर्ष करताना 12 दिवसाचे नवजात बाळ अखेर दगावले.

अमेरिकेत तीन दिवसाच्या बाळाचा मृत्यू

तर, यापूर्वी अमेरिकेतील कनेक्टिकट येथे सहा आठवड्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वेल्समध्ये तीन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला. त्याची आई कोरोना बाधित होती.

नाशिकमध्ये 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नाशिकमध्ये एका 3 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याला इतरही काही गंभीर आजार होते. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे.

औरंगाबादमध्येही 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या बाळाला इतरही आजार होते. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर होती. तसेच, औरंगाबादमध्ये यापूर्वी 30 मार्चला 29 दिवसांचा मुलगा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. 27 एप्रिलला 1 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, 1 मे रोजी 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - 'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका'; चिठ्ठी लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.