नागपूर - नागपुरात वाढत्या रुग्णसंख्येसोबत वाढत चाललेल्या मृत्यूमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. दररोज मृत्यूच्या संख्येचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. मागील 24 तासात 7 हजार 344 नविन बाधित मिळून आले असून 110 जणांच्या मृत्यूच्या संख्येने नागपुरात थैमान घातला आहे.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात 21 हजार 585 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. यात शहरात 4,619 जण तर ग्रामीण क्षेत्रात 2,718 जण हे कोरोनाने बाधित झाले आहे. तसेच 110 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात 58 बाधित शहरातील, 45 बाधित ग्रामीण भागातील तर 7 जण हे बाहेर जिल्ह्यातील होते. तर याबरोबरच 6,314 जणांनी कोरोनावर मात केली. सोमवार ते शुक्रवार या चार दिवसात 412 रुग्ण हे दगावले असून सरासरी 100पेक्षा जास्त आहे.
पूर्व विदर्भातही परिस्थिती बिकट होत असताना सहा जिल्हे मिळून 185 जण हे कोरोनाने दगावल्याची नोंद आहे. या मृत्यूमागे कुठेतरी प्रशासनाचा गलथान कारभार, अपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे अपयश दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 34 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.
पूर्व विदर्भातील रुग्णसंख्या -
नागपूर - 7,344
भंडारा - 947
गोंदिया - 662
चंद्रपूर - 1,537
वर्धा - 935
गडचिरोली - 348