ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी दोन दिवसात 10 हजार अर्ज

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही नियंत्रणात आलेला नसल्याने केंद्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनला 17 मे पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्यामुळे राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने अडकलेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहचवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : May 3, 2020, 4:29 PM IST

नागपूर - लॉकडाऊनची मुदत आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने राज्याच्या इतर शहरात अडकलेल्या नागपूरकरांनी घरी परत येण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याकरिता नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 10 हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. याशिवाय लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकून पडलेल्या इतर राज्यातील मजूर, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही नियंत्रणात आलेला नसल्याने केंद्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनला 17 मेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्यामुळे राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने अडकलेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहचवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने काही अटींवर परवानगी दिली आहे . यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या www.nagpur.gov.in या इंटरनेट संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. हे ऑनलाइन अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या नावे सादर करायचे आहेत, असे ठाकरे म्हणाले. अर्ज करताना स्वतः चे वाहन अथवा शासकीय सुविधा, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, दूरध्वनी, कुठून कोठे जायचे आहे, किती व्यक्ती सोबत असतील, त्यांचा संपूर्ण तपशील सादर करणे आवश्यक आहे. 'एनओसी' शिवाय प्रवेश मिळणार नाहीत, नागपुरात येणाऱ्या आणि नागपुरातून जाणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.