ETV Bharat / state

'टायगर कॅपीटल'मध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू, ८ दिवसातील दुसरी घटना

नागपूर जिल्ह्याची 'टायगर कॅपीटल' म्हणून ओळख आहे. मात्र, एकाच आठवड्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच आठवड्यात रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीटमध्ये सुद्धा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता वाघ आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

tiger deadbody found in pench tiger reserve area
'टायगर कॅपीटल'मध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू
author img

By

Published : Dec 11, 2019, 9:59 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खडसा येथे वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

'टायगर कॅपीटल'मध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू

नागपूर जिल्ह्याची 'टायगर कॅपीटल' म्हणून ओळख आहे. मात्र, एकाच आठवड्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच आठवड्यात रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीटमध्ये सुद्धा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता वाघ आढळून आल्याने खळबळ माजली आहे. वाघाचा मृतदेह दिसताच ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. या वाघाच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत. त्यामुळे त्याची शिकार झाली किंवा दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाल्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

हे वाचलं का? - नागपूरमध्ये बिहाडा खाणीतील खड्ड्यात बुडून वाघाचा मृत्यू

Intro:टायगर कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे...याच आठवड्यात रामटेक वनपरिक्षेत्र तील मानेगाव बीट मध्ये सुद्धा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता,आता खडसा येथे पुन्हा एक वाघ मृत आढल्यानं खळबळ माजली असून या वाघाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे Body:महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पूर्ण वाढ झालेला वाघ मृतावस्थेत आढळून आलाय.... दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेल्या खडसा या गावाजवळ हा वाघ मृतावस्थेत पडून होता...गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली... या वाघाच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत, त्यामुळं त्याची शिकार झाल्याची किंवा दोन वाघांच्या झुंजीत मृत्यु झाल्याची शक्यता कमी आहे. मृत वाघाचे वय झाल्यामुळं या वाघाचा नैसर्गिक मृत्यु झाला असावा असा वन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.