ETV Bharat / state

Zero Corona Death in Dharavi : धारावीत तिसऱ्या लाटेत दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद - धारावी कोरोना तिसरी लाट मृत्यू नोंद

डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ( Dharavi Corona Preventive Model ) मात्र, महिनाभरातच धारावीतील कोरोना आटोक्यात आला. धारावीत तिसऱ्या लाटेत आज दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ( Zero Corona Patients Found in Dharavi )

Zero patients recorded for the second time in the third wave in Dharavi
धारावीत तिसऱ्या लाटेत दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद
author img

By

Published : Feb 12, 2022, 7:09 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ( Largest Slum in Asia ) म्हणून प्रसिद्ध असलेली धारावी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ( Corona in Dharavi ) बनली होती. धारावीकरांची साथ, धारावी मॉडेलची अंमलबजावणी ( Dharavi Corona Preventive Model ) यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात आला. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. मात्र, महिनाभरातच धारावीतील कोरोना आटोक्यात आला. धारावीत तिसऱ्या लाटेत आज दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ( Zero Corona Patients Found in Dharavi )

दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद -

मुंबईत ११ मार्च २०२० ला कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. या पहिल्या लाटेत धारावीत १ एप्रिल २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. ३ मे २०२० ला सर्वाधिक ९४ रुग्णांची नोंद झाली. २५ डिसेंबर २०२० ला पहिल्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. पहिली लाट ९ महिने होती या लाटेत ३७८८ रुग्णांची नोंद झाली. १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ८ जून २०२१ ला सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली. १४ जून २०२० ला पहिल्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. दुसरी लाट ५ महिने होती या लाटे दरम्यान २८८१ रुग्णांची नोंद झाली. २७ डिसेंबरला २०२१ पासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. ७ जानेवारी २०२२ ला सर्वाधिक १५० रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत २८ जानेवारीला पहिल्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज १२ जानेवारीला दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

धारावीत २३ सक्रिय रुग्ण -

पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज १२ फेब्रुवारीला धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत एकूण ८६३३ रुग्णांची नोंद झाली असून ८१९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या २३ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - धारावी परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार

धारावी मॉडेलची चर्चा -

धारावीत सुमारे १० लाख लोक दाटीवाटीने राहतात. यामुळे मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होताच धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. धारावीमधील कोरोनाला आटोक्यात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर होते. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येऊन अनेक वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलची चर्चाही जगभरात झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.