ETV Bharat / state

कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा सकारात्मक परिणाम; लोकल ट्रेनमध्ये गर्दी झाली कमी - Zero Death In Mumbai Railway

Zero Death In Mumbai Railway: मध्य रेल्वेवर दर 24 तासात 40 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. प्रचंड गर्दीमुळे अपघात देखील होतात. काही लोकांचे मृत्यू देखील होतात. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 'शून्य मृत्यू' ही मोहीम सुरू केली आहे. (Accident in local train journey Mumbai) मुंबईतील सरकारी खासगी आणि निमसरकारी अशा 450 कार्यालयांना संस्थांना आपल्या वेळा बदलण्याचे पत्र दिलेले आहे. याचा परिणाम रेल्वे कार्यालयाने स्वतः अनुभवला. 20 ते 25 टक्के प्रवाशांनी त्याची अंमलबजावणी केल्यामुळे काही प्रमाणात गर्दी कमी झाली आहे. (Central Railway train)

Zero Death In Mumbai Railway
मुंबई रेल्वे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 8:19 PM IST

मुंबई Zero Death In Mumbai Railway: रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करणे आणि रेल्वेच्या गर्दीमधून खाली पडण्याच्या घटना प्रचंड घडतात. केवळ सप्टेंबर 2023 मध्ये 288 घटना घडल्या. तर रूळ क्रॉस करून जाण्याच्या 505 घटना घडल्या. यामुळे मृत्यूला आमंत्रण मिळते. त्यामुळेच मध्य रेल्वेने शून्य मृत्यू मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमध्ये मुंबईतील सर्व खासगी, सरकारी, निम सरकारी अशा कार्यालय संस्थांना वेळा बदलण्याची विनंती मध्य रेल्वेने केलेली आहे. सुमारे साडेचारशे अशा कार्यालयांना विनंती पत्र धाडले आहेत.

'या' आहेत कार्यालयाच्या वेळा: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे म्हणजेच अप दिशेने सकाळी येताना 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत कार्यालयात येण्याच्या वेळा कराव्यात. जर छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून कल्याण दिशेने म्हणजेच डाऊन दिशेकडे जाताना कार्यालयाच्या वेळा सायंकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान ठेवाव्यात. यामध्ये सरकारी, खासगी संस्थांनी सकाळी 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत कार्यालयात येण्याची उभा ठेवावी. तर सायंकाळी ऑफिसमधून घरी निघण्यासाठी 5:45 वाजे पासून 07:45 वाजे पर्यंत ऑफिस मधून बाहेर पडण्याची मुभा ठेवावी. जेणेकरून लोकलची गर्दी कमी होऊन अपघात आणि मृत्यू कमी होईल.

कर्मचाऱ्यांनी बदलत्या वेळेचे केले पालन: यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे प्रबंधक रजनीश कुमार गोयल म्हणाले की, लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे अपघातात नागरिकांचा जीव जातो. ते टाळण्यासाठी आम्ही 'झिरो डेथ' मिशन मोहीम सुरू केले आहे. यामध्ये सरकारी, खासगी, निमसरकारी संस्था, कार्यालयांनी आपल्या कार्यालयाच्या वेळा लवचिक कराव्यात अशी विनंती केली आहे. याचा सकारात्मक परिणाम मध्य रेल्वेच्याच कार्यालयामध्ये दिसू लागला आहे. मध्य रेल्वेच्या 20% कर्मचाऱ्यांनी या बदललेल्या वेळेचे पालन केलेले आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे.

सर्व केंद्र, राज्य सरकारी कार्यालयांनाही धाडले पत्र: रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी या संदर्भात पुढाकार घेत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय सकट इतर सर्व विभागांना, तसेच केंद्र शासनाच्या मुंबईतील ठाण्यातील विविध प्राधिकरण राज्य शासनाचे विविध प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, ठाणे महापालिका सहित खासगी औद्योगिक, व्यापारी, कॉर्पोरेट संस्था कार्यालय अशा साडेचारशे संस्थांना विनंती पत्र धाडलेलं आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Railway Project: रेल्वे प्रकल्प रद्द केल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसेल; प्रकल्प रद्द करू नयेत- प्रवासी संघटनेची मागणी
  2. Mumbai Railway: पाकिटमारांचा त्रास ते दिव्यांगाच्या अडचणी, केंद्रीय अर्थसंकल्पाकडून रेल्वे प्रवाशांच्या काय आहेत अपेक्षा?
  3. Mumbai Railway Incident CCTV Video : देव तारी त्याला कोण मारी; आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशांचे प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.