मुबंई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हे ऑक्सिजनच्या शोधत अनेक ठीकाणी फिरत होते, त्यातच ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाला. आता याच ऑक्सिजनच्या समस्येवर मात करण्यासाठी घाटकोपरच्या रमाबाई नगर मधील तरुण पुढे सरसावले आहेत.
रमाबाई नगर गंधकुटी बुद्ध विहारात तरुणांनी २४ तास मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू
रमाबाई नगर येधील गंधकुटी बुद्ध विहारात तरुणांनी २४ तास मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. यामुळे परिसरातील व परिसरा बाहेरील रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण येथे येऊन मोफत ऑक्सिजनचा लाभ घेत आहेत.
हेही वाचा-हिंगोलीच्या सोनूवर कोणालाच भरवसा नाय, तब्बल १३ नवरदेवांना फसवणारी सोनू अखेर गजाआड