ETV Bharat / state

Mumbai News: देवावरचा विश्वास उडाल्याने नैराश्यातून तरुणाची मदर मेरी ग्रोटोवर दगडफेक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - मालाड चर्चमधील मदर मेरी ग्रोटो

मालाड चर्चमधील मदर मेरी ग्रोटोची तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. एका वर्षात त्याची आई आणि मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर निराश झाला होता. देवावरचा विश्वास उडाल्याने नैराश्यातून तरुणाची मदर मैरी ग्रोटोवर दगडफेक केली.

Mumbai News
मदर मैरी ग्रोटोवर दगडफेक
author img

By

Published : Mar 5, 2023, 1:39 PM IST

Updated : Mar 5, 2023, 1:57 PM IST

प्रतिक्रिया देताना अजयकुमार बंसल डीसीपी झोन

मुंबई : मदर मेरी ग्रोटो तोडफोड प्रकरणात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोन वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या हेतुने मुंबईत आला होता, पण नोकरी न मिळाल्याने तो मालाड येथील एका स्टॉलवर काम करू लागला. चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की, तो मदर मेरीची खूप पूजा करत असे. वर्षभरात त्याच्या भावाचे आणि आईच्या निधनामुळे तो निराश झाला होता. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तो त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकला नाही. मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मदर मेरीच्या पुतळ्याचे काचेचे कवच फोडले : सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर आणि माहिती गोळा केल्यानंतर, पोलिस अधिकार्‍यांनी त्याचा शोध घेतला, असे अधिकारी म्हणाले. गेल्या गुरुवारी, मालाड पश्चिमेकडील ओर्लेम चर्च परिसरात एका 'अज्ञात गुन्हेगाराने' दगडफेक करून मदर मेरीच्या पुतळ्याचे काचेचे कवच फोडले. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्‍या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, डीसीपी अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अधाने, त्यांच्या तपास पथकासह तपास करत होते.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी : पीएसआय शिवाजी शिंदे आणि एपीआय सचिन कापसे यांनी सीसीटीव्ही फुटेज वापरून आरोपीची ओळख पटवली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील ऑनलाइन चर्च येथे एका तरुणाने मदर मेरी ग्रॉटोवर दगडफेक केल्याचा एक फोन पोलिसांना आला होता. पोलिसांनी क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. सुदैवाने मूर्तीला कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते, मात्र पुढे काही अनर्थ होऊ नये, यासाठी पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटवत त्याला बेड्या ठोकल्या.

काम न मिळाल्यामुळे तो नैराश्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा मुंबईत चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी आला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्याची आई आणि भावाचे निधन झाल्यामुळे तो एकटाच होता, मात्र चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे त्याने एका चायनीज गाडीवर काम करण्यास सुरुवात केली. चित्रपटात काम न मिळाल्यामुळे तो नैराश्यात गेला. देवावरचा विश्वास उडाल्यामुळे त्याने चर्चमधील मदर मेरी ग्रोटोवर दगडफेक केली असे तपासात आढळून आले.

हेही वाचा : Heart Attack And Cardiac Arrest: हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय असतो फरक; 'हे' उपाय करून राहा निरोगी

etv play button

Last Updated : Mar 5, 2023, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.