ETV Bharat / state

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी पोलिसांना धरले जबाबदार - Wadala Truck Terminal

मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर अदखपात्रचा गुन्हा दाखल केला. या तरुणांमध्ये विजयसिंगचा सामावेश होता.

मृत विजयसिंग
author img

By

Published : Oct 28, 2019, 11:29 PM IST

Updated : Oct 28, 2019, 11:53 PM IST

मुंबई- वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजय सिंग (२६) असे त्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय

२७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला होता. त्यानुसार पोलिसांची बीट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेत काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते.ज्यात विजय सिंगचाही सामावेश होता. पोलीस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजयसिंगच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

विजयसिंगचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या विजयसिंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी दिली आहे.

Intro:रस्त्यावर भांडण करत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यावर त्याच्या छातीत दुखू लागले यानंतर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई पोलिसांच्या वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या नातेवाइकांनी पोलिस मारहाणीत विजय सिंग (26) या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. Body:27 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत असल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल आला होता. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांची बीट मार्शल दाखल झाली असता, पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते ज्यात विजय सिंग याचा सुद्धा समावेश होता . पोलिसांनी पोलिस ठाण्यात या तरुणांना आणल्यानंतर त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र काही वेळातच विजय सिंग याने त्याच्या छातीत दुखत असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना विजय सिंग यांचा मृत्यू झाला.
Conclusion:विजय सिंगच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू हा पोलीस मारहाण झाल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी अधिक तपासासाठी विजय सिंग याचा मृतदेह जेजे रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचा मुंबई पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी म्हटलं आहे.

( बाईट- अशोक प्रणय , डीसीपी )
Last Updated : Oct 28, 2019, 11:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.