ETV Bharat / state

फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मोबाईलसाठी घेतले होते कर्ज!

author img

By

Published : Jun 24, 2021, 10:44 PM IST

आशुतोषने फायनान्स कंपनीकडून मोबाईलसाठी कर्ज घेत होते. कर्जाचे हप्ते थकलेल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धमकावल्यामुळे तणावात आलेल्या आशुतोष टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली.

young man commit suicide in jalgaon
फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मोबाईलसाठी घेतले होते कर्ज!

जळगाव- मोबाईलसाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना योगेश्वरनगरात घडली आहे. आशुतोष अनिल पाटील (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने मोबाईलसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थकले होते. कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीकडून सतत तगादा लावला जात होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी घरी येऊन धमकावल्यामुळे तणावात आलेल्या आशुतोषने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली.

पुण्यात खासगी कंपनीत होता नोकरीला-
आशुतोष हा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. लॉकडाऊन लागल्यापासून घरीच राहत होता. त्याने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत मोबाईल घेतला होता. या कर्जाचे हप्ते थकलेले होते. कंपनीकडून कर्जासाठी सतत तगादा लावला जात होता. कर्ज वसूल करण्यासाठी कंपनीचे दोन कर्मचारी त्याच्या घरी आले होते. त्यांनी आशुतोषला धमकावले तसेच कर्ज वसूली करण्यासाठा त्याची दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजाऱ्याने कर्मचाऱ्यांना हटकल्याने ते निघून गेले होते.

घरी कुणीही नसताना केली आत्महत्या-
घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे आशुतोष प्रचंड तणावात आला होता. कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत तो होता. त्यामुळे घरी कोणीच नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी धमकावल्या प्रकरणी कुंटुबीय करणार तक्रार

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आशुतोषला धमकवल्याचे शेजाऱ्यांकडून माहिती झाले. या संदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याचे मृत आशुतोषच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

हेही वाचा - शबाना आझमी यांनी ऑनलाइन मागवली होती दारू, पैसे भरुनही झाली फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.